Take a fresh look at your lifestyle.

Surat-Chennai Greenfield Highway : अहमदनगर-बीड-धाराशिव-सोलापूरातील ‘या’ गावांतून जाणार ‘हा’ महामार्ग ; पहा, गट नंबर अन् शेतकऱ्यांची नावे

1

अरबी समुद्राला बंगालच्या उपसागराबरोबर जोडणारा – मराठवाड्यातील बीड – धाराशिव सारख्या विकासापासून उपेक्षित असणाऱ्या जिल्ह्यांना एक नवा विकासाचा मार्ग दाखवणारा – याचबरोबर शेती उद्योग व्यवसायाला एक नवी चालना देणारा महत्त्वाचा महामार्ग म्हणजे चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे (Chennai – Surat Greenfield Expressway)… 

तब्बल 1271 किलोमीटरचा सहा पदरी महामार्ग हा सुरत ते सोलापूर एकूण 564 किलोमीटर ते सोलापूर ते चेन्नई एकूण 707 किलोमीटर अशा दोन भागात विभागाला असून महाराष्ट्राच्या शेतीसह उद्योग व्यवसायाला एक नवी चालना देण्यासाठी विकासाचा महामार्ग म्हणून आपण या महामार्गाकडे पाहिलं जातं.

हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमधून या मार्गाचा मार्गक्रमण कशाप्रकारे होणार आहे ? कोण- कोणती गावं या महामार्गांतर्गत अंतर्गत जाणार आहेत ? ज्या जिल्ह्यामधील गावांच्या सर्वे नंबर ची माहिती मिळाली ती आपण खाली दिली आहे.

मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेच्या माध्यमातून 10 व 17 ऑगस्ट 2022 रोजी सोलापूर 3D तर बीड – अहमद नगर 3A चे  नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अहमदनगर,  बीड, धाराशिव जिल्ह्यातील गावे त्याचप्रमाणे सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यामधील काही गावांचा यामध्ये समावेश करून नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर, जमिनीचा प्रकार, अधिग्रहित क्षेत्र, जमीन मालकांची नावे अशा प्रकारची सर्व माहिती आपल्याला राजपत्रकात मिळणार आहे. हे राजपत्रक 55 पानांचं असून काळजीपूर्वक वाचा.

अहमदनगर – बीड जिल्ह्यातील गावांची नावे पाहण्यासाठी  :- इथे क्लिक करा

सोलापूर जिल्ह्यातील जमीनदार मालकांची नावे पाहण्यासाठी  :- इथे क्लिक करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीनदार मालकांची नावे पाहण्यासाठी  :- इथे क्लिक करा

या संबंधातील नोटिफिकेशन तुम्ही egazette.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावांतून जाणार हा चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे, पहा…

नाशिक मधून येऊन अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 98.5 किलोमीटर अंतर कापून हा महामार्ग संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत व  जामखेड या 6 तालुक्यातून जाणार आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 49 गावातील अंदाजे 1500 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. तर वांबोरी घाटात 30 ते 40 मीटर उंचीचे खांब उभारून हा महामार्ग जाणार आहे.

संगमनेर तालुका :- 13 गावे – 282 हेक्टर जमीन
राहता तालुका :- 5 गावे – 94 हेक्टर जमीन
राहुरी तालुका :- 19 गावे – 428 हेक्टर जमीन
नगर तालुका :- 10 गावे – 256 हेक्टर जमीन
जामखेड तालुका :- 13 गावे 302 हेक्टर जमीन

इंटरचेंजसाठी 125 हेक्टर आणि अतिरीक्त 10 -एकूण :- 1498 हेक्टर जमीन या मार्गासाठी संपादन होणार…

अहमदनगर जिल्ह्याच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी केंद्र सरकारने अंदाजे तब्बल 1020 कोटींची तरतूद केलेली आहे…

गावांची यादी पहा :-  

हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरपासून थेट चिंचोली गुरव, तळेगाव, वडझरी, कासारे, लोहारे, गोगलगाव, सदतपूर, हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे – खडांबे, वांबोरी  मांजरसुब्बा पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी, सोनेवाडी, पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील, आठवड मधून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.

टीप :-  अहमदनगर जिल्ह्यातील जमीदारांची नावे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरच प्रकशित केली जाणार असून त्याबाबत अपडेट येत्या काही दिवसांत आपण पाहू…

पुढे जामखेड तालुक्यातून डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, ददसलेवाडी,खांडवी, फक्राबाद, बावी, राजेवाडी,नान्नज,वंजारवाडी, पोटेवाडी, चोभेवाडी मार्गे हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात प्रवेश करणार…

या महामार्गाबद्दल थोडक्यात माहिती :-

हा महामार्ग 6 पदरी नियोजित असून याची रुंदी 70 मीटर असणार आहे, मात्र महामार्गाची जमीन अधिग्रहण हे 100 मीटर साठी होणार आहे.

साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत या रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचं शासनाचं टार्गेट आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर

रस्ता बांधून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR तयार करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्यांसाठी, शेतीविषयक योजना, आर्थिक, ऑटो, बाजारभाव, बिझनेस आयडिया, महामार्ग मॅप, ई. अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हाट्स ग्रुप वर जॉईन व्हा…

लिंक :- https://chat.whatsapp.com/HA54aNCgQ55EfmNyapwE12

Leave A Reply

Your email address will not be published.