पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : ‘या’ जिल्ह्यात 4 तालुक्यातील 38 गावांमध्ये भूसंपादनाला सुरुवात ; पहा तालुकानिहाय अंतर अन् गावांची नावे…
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH 4) चा एक जलद पर्याय असणार आहे. आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. 120 किमी / तास या वेगाला सपोर्ट करणारा, नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग हा आठ लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस – वे असणार आहे.
यामुळे पुणे ते बंगळुरू हे अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे पुणे आणि बंगळुरू दरम्यानचा प्रवास सध्याच्या 11 ते 12 तासांच्या तुलनेत 7 ते 8 तासांपर्यंत कमी होणार आहे. विमानाची धावपट्टी (Airplane runway) असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे.
पुणे बंगलोर एक्सप्रेस-वे हा आठ पदरी डांबरी ग्रीनफिल्ड महामार्ग वारवे बुद्रुक येथून सुरू होईल. महाराष्ट्रातील हा पुणे जिल्ह्यातून सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दुष्काळी भागातून – सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ मिरज तालुक्यातून जाईल. कर्नाटकात, पुणे बंगलोर द्रुतगती मार्ग बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर या मार्गे जाईल आणि नंतर बंगळुरूला जोडला जाणार आहे.
याबाबत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबतची नोटीस नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार खानापूर आणि मिरजेच्या उपविभागीय अधिकार्यांची या कामी भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
ज्या अर्थी परियोजना निर्देशक भा. रा. र. प्रा पकाई – पुणे यांच्याकडील पत्र दिनांक 23 आठ 2022 अन्वये भारतमाला फेस टू परिवहन अंतर्गत पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय एक्सप्रेस – वे सांगली जिल्ह्यातून जात असलेल्या किलोमीटर साठी खानापूर, तासगाव, कवठे महाकाळ, मिरज तालुक्यातील 120 ते 201 अंतरासाठी भूसंपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांची नेमणूक केली आहे.
पहा, सांगली जिल्ह्यातील गावे आणि अंतर :-
मिरज :- 120.570Km ते 150.100 Km :- माहुली, वलखड, वेजेगाव भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द . या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी विटा, उपविभाग खानापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तासगाव :- 150.100 Km ते 176.740 Km :- कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण. या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कवठे महांकाळ :- 176.740 Km ते 196.035 Km :- बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी. या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिरज :- 196.035 Km ते 201.200 Km :- सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी. या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत पुणे, सातारा जिल्ह्यातही लवकरच भूसंपादन सुरु होणार असून याबाबतही आपण अपडेट पाहणार आहोत. तसेच शेतकऱ्यांची नावे गट नंबर / सर्व्हे नंबर, मॅप बाबत माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या व्हाट्स अँप ग्रुप ला अँड व्हा..