शेतीशिवार टीम : 28 सप्टेंबर 2022 : राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील या ग्रामपंचातींसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार होतं. परंतु आता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

परंतु आता या निवडणुका 13 ऑक्टोबर ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी होणार असून 17 ऑक्टोबरला म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हंटल आहे की, सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. तसेच मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करण्यात येणार आहे.

या निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच दिवाळीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 204 ग्रामपंचायत निवडणुका दिवाळीनंतर जाहीर होणार आहे. यामध्ये पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या 204 आणि नव्याने स्थापित झालेल्या दोन आशा 206 ग्रामपंचायतीचा समावेश असणार आहे.

त्यामुळे दिवाळीचे फटाके वाजल्यानंतर गावकीच्या कारभारावर मांड ठोकण्यासाठी प्रचाराचे फटाके वाजणार आहेत. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत दर पाच वर्षांनी घेण्यात येते. मुदत संपण्याच्या कालावधी आधी या निवडणुकीची प्रक्रिया संपन्न होत असते.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2022 मध्ये पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार साधारणतः नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता आहे.

याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून जारी झाल्यानंतर ही निवडणूक होणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना गाव कारभारी म्हणून पाहिले जाते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमात सुधारणा करीत थेट जनतेतून सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली.

जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच थेट जनतेतून निवडण्यात आले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले.

महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सदस्यातून सरपंच निवडणूक घेण्याचे निर्देश जारी केले. या निर्णयानुसार जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतीची निवडणूक आणि सरपंच प्रक्रिया पार पडली.

दरम्यानच्या काळात राज्यातील सत्तेत पुन्हा सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुन्हा जनमतातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.

आता या निर्णयानुसार आगामी पंचवार्षिक निवडणुका संपन्न होणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2022 मध्ये जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या 204 आणि नव्याने स्थापित झालेल्या दोन आशा 206 ग्रामपंचायतीची निवडणूक नव्या निर्णयानुसार होणार आहे. नव्याने स्थापित दोन ग्रामपंचायती संगमनेर मधील आहेत.

पहा, तालुकानिहाय ग्रामपंचायती :-

अकोले – 11
नेवासे – 13
जामखेड – 2
नगर -28
राहाता -12
पारनेर -16
राहुरी – 11
श्रीगोंदा- 10
श्रीरामपूर- 6
शेवगाव -12
पाथर्डी – 11
संगमनेर 38 + 2
कर्जत – 8
कोपरगाव – 26

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *