शेतीशिवार टीम : 28 सप्टेंबर 2022 :- सणासुदीच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. मोदी मंत्रिमंडळात जुलै : 2022 साठी महागाई भत्ता (DA Hike) मंजूर करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 4% वाढ मंजूर केली आहे.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 38% झाला आहे. 1 जुलै 2022 पासून हा महागाई भत्ता (DA) लागू होईल. म्हणजेच जुलैपासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% DA चा लाभ मिळणार आहे. यासाठी 2 महिन्यांची (जुलै आणि ऑगस्ट) DA ची थकबाकीही दिली जाणार आहे.

यापूर्वी, सरकारने मार्च 2022 मध्ये DA मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली होती, जी 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली होती. केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA Hike) वर्षातून दोनदा वाढवते. पहिला जानेवारीपासून आणि दुसरा जुलैपासून लागू होता. मात्र, मार्च आणि सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा केली जाते.

पेन्शनधारकांना महागाईचा मोठा दिलासा :-

7th Pay आयोगांतर्गत, केंद्रीय कर्मचार्‍यांव्यतिरिक्त, पेन्शनधारकांनाही वाढत्या महागाई सवलतीचा लाभ मिळेल. केंद्रीय पेन्शनधारकांना महागाई भत्त्याप्रमाणेच लाभ मिळतो. त्यांच्यासाठी महागाईच्या सवलतीतही 4% वाढ झाली आहे. आता पेन्शनधारकांनाही 38% दराने पेन्शन मिळणार आहे. जर एखाद्याचे पेन्शन 20,000 रुपये असेल तर 4% दराने त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा 800 रुपयांची वाढ होणार आहे.

DA वाढल्याने पगारात होणार इतकी वाढ ?

किमान मूळ वेतन (Minimum Basic Wage) असलेल्यांसाठी DA / 720 वाढला महिना

1. किमान मूळ वेतन :- रु.18,000
2. नवीन महागाई भत्ता :- (38%) रु.6840 / महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता :- (34%) रु. 6120 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढला :- 6840-6120 = रु. 720/ महिना
5. वार्षिक पगारात वाढ :- 540X12 = रु. 8640

किमान मूळ वेतन (Minimum Basic Wage) असलेल्यांसाठी दरमहा DA / 720 रु. ने वाढला.

कमाल मूळ पगार (Maximum Basic Pay) असलेल्यांसाठी दरमहा DA / 2276 रु. ने वाढला.

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन :- रु. 56900
2. नवीन महागाई भत्ता (38%) :- रु. 21622 / महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) :- रु. 19346 / महिना
4. 21622-19346 ने किती महागाई भत्ता वाढला = रु. 2276 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 1707X12 = रु. 27312

टीप : हे कॅल्क्युलेशन बेसिक सॅलरीच्या आधारे केली गेली आहे. मात्र, त्यात इतर भत्त्यांची भर पडल्यास पगारात वाढ जास्त होते. DA वाढल्याने इतर भत्त्यांवरही परिणाम झाला आहे.

कसा मोजला जातो महागाई भत्ता (DA) ?

महागाई भत्ता (DA Hike) 4 टक्क्यांनी वाढवायचा असेल तर तो मूळ पगारावर मोजला जाऊ शकतो. जर एखाद्याचे मूळ वेतन 20,000 रुपये असेल, तर 4% दराने त्याचे मासिक वेतन 800 रुपयांनी वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *