शेतीशिवार टीम : 28 सप्टेंबर 2022 :- दसरा – दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (RPF/RPSF कर्मचारी वगळता) 78 दिवसांच्या पगाराच्या समतुल्य उत्पादकता लिंक्ड बोनस (Productivity Linked Bonus) मंजूर केला आहे. या निर्णयाचा फायदा 11.56 लाखांहून अधिक अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (Non-Gazetted Railway Employees) होणार आहे.

इतका मिळणार आहे कमाल बोनस :-

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या या बोनसमुळे सरकारवर सुमारे 2000 कोटी रुपयांचा ताण पडणार आहे. पात्र रेल्वे कर्मचार्‍यांना PLB पेमेंटसाठी विहित वेतन गणना मर्यादा रुपये 7000 प्रति महिना आहे.

यासाठी 78 दिवसांच्या बोनसची कमाल मर्यादा 17,951 रुपये आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दसरा /पूजेपूर्वी पीएलबी (PLB) दिले जाते. मंत्रिमंडळाचा हा निर्णय यंदाही कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याची भेट आहे.

रेल्वेने गेल्या वर्षीही आपल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला होता. रेल्वे कर्मचार्‍याला 30 दिवसात 7000 रुपये बोनस मिळतो. अशा परिस्थितीत 78 दिवसांसाठी त्या कर्मचाऱ्याला सुमारे 18000 रुपयांचा बोनस मिळणार आहे.

दसऱ्यापूर्वी बोनसचे पैसे होणार खात्यात जमा :-

रेल्वे बोर्डाने यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता, त्याला लवकरच कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळ सहसा दसऱ्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर करते. यामध्ये सरकारच्या तिजोरीवर 2000 कोटी रुपयांचा ताण पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *