Pink E-Rickshaw Yojana 2025 : महिलांना फक्त 12,300 रुपयांत मिळणार ई-रिक्षा ; पहा पात्रता-निकष, कागदपत्रे अन् PDF अर्ज फॉर्म..
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक नवीन योजना सुरू केली असून याचा फायदा राज्यातील सर्व महिलांना होणार आहे. या योजनेचे नाव महाराष्ट्र पिंक ई – रिक्षा योजना (Pink E-Rickshaw Yojana 2025) आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यातील 17 शहरांमध्ये चालवली असून या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वाभिमान देणे आणि रोजगार आणि सुरक्षिततेशी संबंधित त्यांच्या चिंता दूर करणे आहे..
आजच्या लेखात, आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जसे की, योजनेचा उद्देश, पात्रता – निकष, आवश्यक कागदपत्रासह अर्ज करण्याची नेमकी प्रोसेस काय आहे ? म्हणून हा लेख पूर्णपणे वाचा..
काय आहे, पिंक ई -रिक्षा योजना ?
महाराष्ट्र पिंक ई – रिक्षा योजना ही एक सरकारी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील 17 प्रमुख शहरांमध्ये ई-रिक्षा सुरू करून महिलांना रोजगार आणि सुरक्षितता प्रदान करणे आहे. महाराष्ट्र पिंक ई – रिक्षा योजना सुरू करण्याची सूचना महिला आणि बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली असून महानगरपालिकामार्फत ही योजना कार्यरत राहणार आहे.या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना राज्य सरकारचे अनुदान आणि बँकांमाफत कर्ज दिले जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षात 5,000 रिक्षांचे वाटप केले जाणार आहे.
महत्वाचे :-
शासनाकडून या योजनेसाठी जास्तीत जास्त 80 हजार रुपयांची आर्थिक मदत अनुदानाद्वारे दिली जाणार असून महिलांना ऑटो खरेदीसाठी फक्त 12,300 रुपये स्वहिस्सा राहणार आहे. उर्वरित रक्कम रक्कम बँक कर्ज आणि सरकारी अनुदानाद्वारे भरली जाईल. बँक कर्ज परतफेडीसाठी महिलांना बँक कर्जाचा हप्ता 5 वर्षांसाठी दरमहा 6,000 रुपये असणार आहे..
काय आहेत पात्रता आणि निकष ?
अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विधवा, घटस्फोटित किंवा दारिद्र्यरेषेखालील महिला अर्ज करू शकतात.
अर्जदाराचे बँक खाते असणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
1.आधार कार्ड
2. उत्पन्नाचा दाखला
3. बँक पासबुक
4. निवास प्रमाणपत्र
5. ड्रायव्हिंग लायसन्स
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी
8. पासपोर्ट आकाराचा फोटो
मोफत नोंदणी आणि प्रशिक्षण..
पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत, शासनाकडून नोंदणी आणि विमा मोफत केला जाईल. यासोबतच, लाभार्थी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि ड्राइव्हिंग लायसन्स देखील मोफत दिले जाणार आहे.
या शहरांमध्ये राबवली जाणार योजना (लाभार्थी संख्या)
मुंबई उपनगर – 1400
ठाणे – 1000
नवी मुंबई – 500
कल्याण – 400
पनवेल – 300
डोंबिवली – 400
वसई-विरार – 400
नाशिक – 700
पुणे – 1400
नागपूर – 1400
अहिल्यानगर – 400
पिंपरी – 300
अमरावती – 300
चिंचवड -300
छत्रपती संभाजीनगर – 400
कोल्हापूर – 200
सोलापूर – 200
पिंक ई – रिक्षा योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
अर्जाची लिंक :-
सरकारने अद्याप या योजनेसाठी अधिकृत वेबसाइट जाहीर केलेली नसली तरी महानगरपालिकेच्या प्रादेशिक कार्यालयांच्या सामाजिक विकास विभागामध्ये तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता..
संपर्क : महिला आर्थिक विकास महामंडळ, नालेगाव, अहिल्यानगर