Take a fresh look at your lifestyle.

फळबाग लागवड योजनेंतर्गत आता खतांसाठीही १०० टक्के तर ‘या’ १५ फळ पिकांसाठी 1.50 लाखांपर्यंत सबसिडी, पहा अर्ज प्रोसेस..

शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांसाठी खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामांसाठी शेतकऱ्यांना शासनाकडून १०० टक्के अनुदान देण्यात येते.

आता या योजनेंतर्गत खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मंत्री मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली.

माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून ६ जुलै २०१८ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू आहे. या फळबाग लागवडअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते.

त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबकऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली. तसेच राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

फळपीक योजनेसाठी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी :- इथे क्लीक करा