Navin Vihir Yojana 2022। ‘या’ लाभार्थ्यांना नवीन विहिरीच्या बांधकामासाठी मिळणार 2.50 लाख रु. अनुदान ; असा करा ऑनलाईन अर्ज…
शेतीशिवार टीम, 27 जून 2022 :- सध्या सोशल मीडियावर व म्हणजे सगळ्यात जास्त व्हाट्सअप वर नवीन विहिरी बांधण्यासाठी 100% अनुदान दिलं जात आहे ही पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु ही योजना खरी आहे का ? जर असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ? लॉटरी लागल्यानंतर काय कागदपत्रे द्यावी लागतील ? लाभ काय दिला जाईल? ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा…(vihir anudan yojana maharashtra 2022)
आपण जर पाहिलं तर राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी नवीन विहीर / जुन्या विहिरींची दुरुस्ती / इनवेल बोअरिंग विद्युत जोडणी / असेल सोलर पंपअनुदान / शेततळे / ठिबक सिंचन – तुषार सिंचन / परसबाग अशा प्रकारच्या विविध ठिकाणी राबवल्या जातात. त्यासाठी राज्यांमध्ये ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ ही योजना राबवली जाते.
मित्रांनो सर्वात प्रथम निर्माण झालेला गैरसमज असा आहे की, एस सी (SC) आणि एसटीच्या (ST) लाभार्थ्यांना Maha DBT पोर्टल वरती बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवल्या जाणाऱ्या बाबी आहे.
या बाबींमध्ये नवीन विहिरी बांधण्यासाठी 95% अनुदानावर ते 100% अनुदानावर अर्थसहाय्य दिलं जातं. परंतु ही खरी असून ती योजना फक्त एस टी (ST) / (SC) प्रवर्गासाठी दिली जात आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने Maha DBT पोर्टलवरचं करायचा आहे. या योजनेसंदर्भात 26 ऑगस्ट 2021 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अधीन राहून ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता / लाभ / अनुदान / ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
टीप :- मराठा बांधवांसाठी ही नवीन विहीर अनुदानासाठी योजना आहे. त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचा…
अनुदान :-
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन या योजनेंतर्गत…
नवीन विहिरींच्या बांधकामासाठी :- 2.50 लाख रु. अनुदान
जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी :- 50 हजार रु. अनुदान
शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी :- 1 लाख रु. अनुदान
इनवेल बोअरींगसाठी :- 20 हजार रु. अनुदान
पंप संच :- 20 हजार रु. अनुदान
वीज जोडणी आकार :- 10 हजार रु.अनुदान
ठिबक सिंचन संचासाठी :- 50 हजार रु. अनुदान
तुषार सिंचन संचासाठी :- 25 हजार रु. अनुदान
पीव्हीसी पाईपसाठी :- 30 हजार रु. अनुदान
परसबाग :- 500 रु. अनुदान
डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेसाठी पात्रता :-
लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
जातीचा दाखला असायला हवा.
जमिनीच्य 7/12 व 8- अ चा उतारा असायला हवा.
लाभार्थ्यांचा (1 लाख 5000 रु. मर्यादा) उत्पन्नाचा दाखला
लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेकरता नवीन विहीरीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
2) 7/12 व 8 – अ चा उतारा
3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र ( रु.1,50,000/- पर्यंत).
4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र. (100 / 500 रु च्या स्टॅम्प पेपरवर )
5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
6) तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
11) ग्रामसभेचा ठराव.
महत्वाचं :- डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना :- ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
नवीन विहीरीसाठी अर्ज करू इच्छिणारे राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खाली दिलेल्या टेप्स फॉलो करा.
1.सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या ऑफिसियल वेबसाइट जावे लागेल. ऑफिसियल वेबसाइट ला भेट दिल्यानंतर, होम पेज उघडेल.
2.या होम पेजवर तुम्हाला (Beneficiary Services) लाभार्थी सेवांचा ऑप्शन दिसेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमचा वापर कर्ता आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.किंवा आधार कार्ड ओटीपी वरूनही तुम्ही लॉग इन करू शकता.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ‘अर्ज करा’ यावर किल्क केल्यांनतर कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना तुमच्यासमोर दिसेल.
त्यामध्ये कृषी यांत्रिकरण / सिंचन साधने / व सुविधा बियाणे औषधे व खते / फलोत्पादने / अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विशेष योजना यापैकी तुम्हाला अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विशेष योजना मध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हे ऑप्शन दिसेल. त्याच्या शेजारी ‘बाबी निवडा’ वर क्लिक करा.
या नंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही, तालुका / गाव / गट नंबर / मुख्य घटक / घटक निवड मध्ये (नवीन विहिरीचे बांधकाम) ही माहिती भरल्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा.
यावर क्लिक केलं तरीही तुमचा अर्ज सबमिट झालेला नसतो. यासाठी पुन्हा एकदा अर्ज करा वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला पहा व मेन्यू वर जा. तुम्हाला पहा वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही सर्व सूचना वाचून तुम्ही पहा नावावर पुन्हा क्लिक करून तुम्हाला अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट ऑप्शन खुलेल. तुम्हाला 23.60 रु. ऑनलाईन भरा.
अशापद्धतीने तुमचा अर्ज भरला जाईल…
मराठा बांधवांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना…
मराठा बांधवांसाठी ही नव्या विहिरीच्या अनुदानासाठी योजना आहे. त्या योजनेचं नाव म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना…
परंतु या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नसल्याने तूम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्यासाठी तुम्ही हा PDF फॉर्म डाउनलोड करा. आणि तलाठी / ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना :- ऑफलाईन अर्ज PDF form 1
आपल्या शेतकरी, उद्योजक बांधवांसाठी :-
शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवारच्या योजनेच्या बातमीची लिंक आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…
धन्यवाद…