गहू बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन

0

पेरणीपूर्वी थायरम हे औषध 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर अझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे. जिवाणू संवर्धन लावून पेरणी केल्यास उत्पन्नात निष्चितच वाढ होते.

जीवाणु संवर्धन हे बीज प्रक्रिया केल्यानंतर लावावे व बियाण्यास घट्ट चिटकले पाहिजे याची काळजी घ्यावी. त्यासाठी जिवाणू खत पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावून बियाणे सावलीत वाळवावे. एका ओलीताची सोय असल्यास -42 दिवसांनी दोन ओलीताची सोय असल्यास -21 व 65 दिवसांनी तीन ओलीताची सोय असल्यास -21, 42 व 65 दिवसांनी खत व्यवस्थापन माती परीक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरविता येतात.

म्हणूनपेरणीपूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. गहू पिकास रासायनिक खताचा पहिली मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्याची तिफण वापरून बियाण्यासोबतच द्यावी. बागायती वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.

बागायती वेळेवर आणि उशिरापेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबतच द्यावी. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी ओलीत करतांना द्यावी. कोरडवाहू गहू पेरणी करतांना नत्र व स्फुरदाची पुर्ण मात्रा म्हणजेच 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी. कोरडवाहू गव्हास नत्र विभागुन देवु नये.

Leave A Reply

Your email address will not be published.