Take a fresh look at your lifestyle.

राज्याच्या चिंतेत भर ! मुंबईत आज कोरोनाचा स्फोट ; राज्यात आज आढळले तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण …

0

शेतीशिवार टीम, 28 डिसेंबर 2021 : देशात आधीच ओमिक्रॉनचा (Omicron) धोका निर्माण झाला असताना दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णातही मोठी होताना दिसून येत आहे.आज मंगळवारी एकट्या मुंबईत कोरोनाचा स्फोट झाला असून तब्बल 1,377 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तर संपूर्ण राज्यात आज एका दिवसात 2172 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अशीच परिस्थिती देशाची राजधानी दिल्लीचीही आहे, जिथे 496 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. हा आकडा 4 जूननंतरचा उच्चांक आहे. तर थोड्या वेळापूर्वी, दिल्ली सरकारने शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले असून अनेक निर्बंधही लागू केले आहेत.

देशात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाचे विक्रमी रुग्ण नोंदवले जात आहेत. दिल्लीत सात महिन्यांनंतर 496 कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2172 नवीन रुग्ण आढळले आहेत.

एकट्या मुंबई शहरात 1377 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 55 टक्के कोरोना बाधितांची नोंद मुंबईत झाली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, 338 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.