ड्रॅगन फ्रुट शेतीने शेतकऱ्याला ‘अच्छे दिन’! 2 एकरांत घेतलं लाखोंचं उत्पन्न, शासनही देतंय 1.60 लाखांपर्यंत अनुदान, असा करा अर्ज..

0

पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरत प्रयोगशिल शेतकरी अजय मोटघरे यांनी सेंद्रिय शेतीचा आधार घेतला. त्यानुसार वाशीम तालुक्यातील चांदई शेतशिवारात दोन एकर शेतात त्यांनी केलेल्या ड्रॅगन फ्रुट शेतीपासून भरघोस उत्पन्न मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने मोटघरे यांना समृध्दीचा मार्ग गवसल्याने ‘अच्छे दिन’ आल्याचे आशादायी चित्र आहे.

शहरातील जे. डी. चवरे विद्यामंदिरात शिक्षक म्हणून सेवा देणारे अजय मोटघरे यांनी आरोग्यदायी ड्रॅगन फ्रुटची लागवड करुन फळबाग फुलवित परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ड्रॅगन वृक्षाला साधारणपणे एका हंगामात किमान तीन वेळा जवळपास 400 ग्रॅम वजनाचे 55 ते 60 फळे येतात. या रोपाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच ड्रॅगन फळे येण्यास सुरुवात होते. या झाडांना मे – जून महिन्यात फुले येतात आणि डिसेंबर महिन्यात फळे येतात.

सुरुवातीच्या काळात तुम्हाला या झाडांना लाकडी किंवा लोखंडी काठीचा आधार द्यावा लागतो. ड्रॅगन फ्रुटच्या पासून चांगले उत्पन्न मिळते असल्याने अनेकजण नोकरी सोडून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. एका एकरात दरवर्षी लाखो रुपए उत्पन्न मिळू शकते.

बातमी : ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी शासनाकडून मिळतंय 1.60 लाखांचे अनुदान..

 असा करा ऑनलाईन अर्ज..

या लागवड़ी पीकाला जास्त पाणी लागत नाही तसेच जमिन पण साधारण चालते. 30 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात फळ धारणा चांगली होते. विदभार्तील उन्हाळ्यातील तापमान पाहता तापमान कमी करण्यासाठी फणस, चिकू तसेच इतर फळ झाडे लागवड करण्यावर भर दिला जातो. शिवाय शेडनेटचा वापर केल्या जातो.

ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्यासाठी वालुकामय चिकन मातीसोबत अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमीन या पिकास अधिक पूरक असते. ड्रॅगन फ्रुटची शेतकरी वर्गासाठी वरदान ठरणार असल्याचे अजय मोटघरे यांनी सांगितले. शिक्षक अजय मोटघरे यांनी दोन एकर मध्ये ड्रॅगन फ्रुट सोबत, आंबा, फणस, चिकू, संत्रा तसेच इतर प्रकारची फळ झाडे लागवड केली आहे.

पाण्याचे योग्य असे नियोजन करून मागील दोन वर्षापासून फळ बाग चांगलीच बहरली आहे. त्यांच्या या बागेला जिल्हाधिकारी तसेच विभागीय नोडल अधिकारी डॉ. प्रशांत नाईक अमरावती, कृषी अधिकारी संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे, कृषी सहाय्यक ढोकणे यांनी भेट देऊन सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.