Government Schemes For Farmers : प्रत्येक शेतकऱ्याला सरकार कडून दरवर्षी ३६ हजार रुपये पेंशन; असा करा अर्ज
शेती शिवार : Government Schemes For Farmers । देशातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कडून विविध योजना राबवल्या जातात. आम्ही तुम्हाला एका योजनेबाबत सांगणार आहोत ज्या माध्यमातून देशातील प्रत्येक शेतकऱ्याला सरकार कडून दरवर्षी ३६ हजार रुपये मिळतात. होय, पीएम किसान मानधन पेन्शन योजना असं या योजनेचे नाव असून हि रक्कम पेन्शन स्वरूपात शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. हि योजना नेमकं कशी काम करते? त्यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय आहे पीएम किसान मानधन पेन्शन योजना- Government Schemes For Farmers
सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना (PM Kisan Mandhan Pension Yojana) पीएम-किसानशी जोडली आहे. म्हणजेच काय तर जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाच पीएम किसान मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत (Government Schemes For Farmers) नोंदणी करावी लागेल. तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला सरकार कडून ३००० रुपये मिळतील. म्हणजेच दरवर्षी तब्बल ३६००० रुपये शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात मिळेल.

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- मासिक पेन्शन
शेतकऱ्यांना 60 वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹3000 पेन्शन दिले जाते.
योग्य लाभार्थी कोण?
वय: 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी
शेती जमीन: 2 हेक्टर (5 एकर) पर्यंतची शेती असलेले लघु किंवा सीमांत शेतकरी
या व्यक्तीने कोणत्याही EPFO/NPS/ESIC योजनेचा सदस्य नसावा.
प्रत्येक महिन्याचा योगदान (Premium):
वयाच्या आधारावर, दरमहा ₹55 ते ₹200 पर्यंत योगदान द्यावे लागते.
सरकार देखील इतकेच योगदान खाते जमा करते.
उदाहरण:
जर एखादा शेतकरी वयाच्या 18व्या वर्षी योजना घेतो, तर त्याला दरमहा ₹55 भरावे लागतील.
जर 40 वर्षी घेतले, तर ₹200 भरावे लागतील.
कुठे करावा अर्ज?
प्रधानमंत्री किसान मानधन पेन्शन योजनेसाठी (Government Schemes For Farmers) अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जावे लागेल. त्याठिकाणी एक ऑटो-डेबिट फॉर्म भरावा लागेल, जेणेकरून दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या बँक अकाउंट मधून कट केली जाईल. जर तुम्ही आधीच PM-Kisan योजनेचे लाभार्थी असाल, तर त्याच पैशातून ती रक्कम कापली जाईल. पेन्शनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक विशेष पेन्शन आयडी नंबर मिळेल.
कोणकोणती कागदपत्रे लागतील ?
आधार कार्ड
बँक पासबुक
जमिनीची कागदपत्रे
Comments are closed.