जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी, किती शुल्क भरावं लागतं ? पहा A टू Z माहिती..

0

मित्रानो शेतकऱ्यांच्या मनात शंका असते आपण वहीत करत असलेले क्षेत्र उताऱ्यावर आहे तेवढेच आहे कि नाही या साठी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण अपुऱ्या माहितीमुळे आपण ते करू शकला नसाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.

शासकीय मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज कशा प्रकारे भरावा? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार? शुल्क किती लागणार? या विषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या लिंक वरून जाऊन अर्ज डाउनलोड करा.

शासकीय मोजणीसाठीचा नमुना भरून तो अर्ज आपल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे जमा करावयाचा आहे आणि जर तुम्ही शहरी भागातली असाल तर नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज जमा करावा लागणार आहे.

मोजणीचे तीन प्रकार असतात.

१.साधी मोजणी आहे, या मोजण्यासाठी शुल्क सुद्धा कमी लागते परंतु कालावधी सहा महिन्याचा असतो, सहा महिन्याच्या आत मोजणी आपणास करून दिली जाते

२ तातडीची मोजणी यासाठी तीन महिने कालावधी लागतो आणि

3.अती तातडीची मोजणी याला दोन महिन्याचा कालावधी यासाठी लागतो.

तुम्हाला तुमच्या शेताची हद्द कायम करायची आहे किंवा अतिक्रमण केलेली आहे ते पाहायचे आहे असे याठिकाणी तुम्ही उद्देश भरावयाचा आहे. तुमचा तालुका गाव आणि गट नंबर तुमच्या शेताचा सर्वे नंबर या ठिकाणी व्यवस्थित भरावयाचा आहे. मित्रांनो आता महत्त्वाची माहिती पाहा:

या अर्जातील सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम, चलन पावती क्रमांक व दिनांक ज्या वेळेस तुम्ही हा अर्ज भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये जमा करण्यासाठी जाणार आहे त्या वेळेस तुम्हाला तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्रफळ आणि त्यासाठी लागणारी शासकीय मोजणीची शुल्क फी किती आहे त्याची माहिती दिली जाईल आणि ते शुल्क कोणत्या अकाउंट मध्ये भरावे यासाठी एक चलन दिले जाईल.

तर ते चलन भरल्याची पावती दिनांक, दिनांक या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरावयाचा आहे, त्यानंतर जमिनीच्या 7/12 मध्ये ज्या सर्व व्यक्तींची नावे आहेत त्या सर्व जणांना बोलावून त्यांचे पत्ते घेऊन त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घ्यावयाची आहे.

आता पाच नंबरच्या मुद्द्यांमध्ये लगतच्या कब्जेधारकाची नावे लिहायची आहे. ज्यावेळेस तुमची अशी शासकीय मोजणी करावयाची आहे, त्यावेळेस तुमच्या शेतीच्या पूर्व-पश्चिम -उत्तर – दक्षिण या चारही बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ते मोबाईल क्रमांकासह तुम्हाला या ठिकाणी भरावयाची आहे,

या अर्जासोबत तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहे

१‌प्रस्तुत अर्ज
२मोजणी फी भरणे बाबत चलन पावती
३ तीन महिन्यात तलाठी यांची स्वाक्षरी असलेले सातबारा

संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरून मित्रांनो तुम्हाला उपअधीक्षक भूमिअभिलेख तालुका यांच्याकडे अर्ज जमा करावयाचा आहे आणि जमा करताना मित्रांनो एक काळजी घ्यावयाची आहे अर्जासोबत जी जी कागदपत्र जोडलेली आहे त्याच्या झेरॉक्स वर सही मारून तुम्हाला एक बंच तयार करावयाचा आहे

आणि त्या बंच वर भुमी अभिलेख अधीक्षक यांच्याकडे अर्ज जमा केल्याचे एक रीतसर पोच घ्यायचे आहे त्या पोच पावतीच्या आधारे तुम्ही पुढील कार्यवाही करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.