आता ‘हे’ महत्वाचं काम केल्यानंतरचं तुमचा ऊस कारखान्याला जाणार ; पहा स्टेप बाय स्टेप फक्त 2 चं मि. अशी करा तुमच्या उसाची नोंदणी…
शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : राज्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. 2021 मध्ये कारखान्याचा गाळप हंगाम मुदतवाढ देऊनसुद्धा बराच सारा ऊस शिल्लक राहिला होता. मराठवाड्यातील 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये उसाचं क्षेत्र बर्याच मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलं होतं. याच पार्श्वभूमीवर 2022 मध्ये गाळप हंगाम पूर्वी सुरु करण्याची तयारीदेखील सुरू करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
परंतु, या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या उसाच्या नोंदी झाल्यानंतरही कारखान्याच्या माध्यमातून टाळाटाळ केली जात होती. शेतकऱ्यांचा नंबर येऊन सुद्धा पुढे ढकलला जात होता. बरेच सारे अतिरिक्त ऊस किंवा इतर नोंदणी नसलेलले ऊस पुढे घेतले जातात. आणि शेतकऱ्यांवर अन्याय होतो.
या सर्वांवर नियंत्रण राहावे, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, त्या शेतकऱ्याच्या नोंदीप्रमाणे शेतकऱ्याचा ऊस जावा म्हणून साखर आयुक्तांच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण असा प्रकल्प राबवला आहे. त्याला महाऊस नोंदणी : 2022 (Maha-US Nondani 2022) या नावाने सुरुवात करण्यात आली असून एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उसाचे क्षेत्र? जात कोणती आहे ? कोणत्या साखर कारखान्याला ऊस पाठवायचा ? या सर्वांची माहिती देऊन तुमची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हीच नोदंणी कशी करायची याबाबत आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.
महाऊस नोंदणी : 2022 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून Maha-US Nondani 2022 हे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करावं.
डाऊनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
डाऊनलोड केल्यानंतर महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक शेतकरी व ऊस नोंदणी हे पेज दिसेल त्याखाली ऊस क्षेत्राची माहिती भरा हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
नंतर ऊस तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, ही माहिती भरून ‘पुढे’ या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर / सर्वे नंबर भरून ‘पुढे’ या ऑप्शनवर क्लिक करा.
आता तुम्हाला हंगाम प्रकार / लागवड प्रकार, उसाची जात, ही ऑप्शनमधून निवडून खाली लागवड दिनांक, ऊस क्षेत्र ( गुंठ्यांमध्ये) किती आहे ते भरून ‘पुढे’ या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची नावे दिसतील त्यापैकी तुम्हाला ज्या कारखान्याला ऊस द्यायचा आहे प्राधान्यक्रमानुसार 3 साखर कारखान्यांची नावे निवडायची आहे.
यांनतर घोषणापत्र वाचून माहिती सबमिट करा यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. धन्यवाद…