Take a fresh look at your lifestyle.

भारतात 10 पैकी 7 जण करतात ही मोठी चूक ; त्याच चुकीमुळे सायरस मिस्त्रींचा गेला जीव, पहा काय आहे, सीट बेल्टचं एअरबॅगशी कनेक्शन ?

0

शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : भारतातील 10 पैकी 7 प्रवासी वाहनाच्या मागील सीटवर बसताना कधीही सीट बेल्ट लावत नाहीत. Local Circle ने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात 10,000 हून अधिक लोकांना सीट बेल्ट घालण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यापैकी 26% लोकांनी मागच्या सीटवर बसून प्रवास करताना नेहमी सीट बेल्ट बांधल्याचे सांगितले. तर, 4% लोकांनी सांगितले की, ते कधीही मागील सीटवर प्रवास करत नाहीत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 70% लोकांनी प्रवासादरम्यान कधीही मागच्या सीटवर सीट बेल्ट लावत नसल्याचे मान्य केलं आहे.

सायरस मिस्त्री यांनीही सीट बेल्ट लावला नव्हता…

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी कार अपघातात मृत्यू झाल्याच्या चौकशीतही त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचे उघड झाले आहे. सायरस मिस्त्री कारच्या मागच्या सीटवर प्रवास करत होते. त्याच्यासोबत गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेल्या ड्रायव्हरसह दोघांनी सीट बेल्ट लावले होते. या अपघातात त्यांचा जीव थोडक्यात बचावला. तर सायरस मिस्त्री यांच्यासह मागच्या सीटवर बसलेल्या जहांगीर पंडोल यांना आपला जीव गमवावा लागला.या दोघांनी सीट बेल्ट लावला नव्हता.

बेसिक सेफ्टी फीचर म्हणजे सीट बेल्ट

सीट बेल्ट हे कार सेफ्टीच्या बेसिक फीचर्सपैकी एक आहे. अनेक देशांमध्ये, ड्रायव्हर आणि सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक आहे. यासाठी कायदे करण्यात आले आहेत. या एअरबॅगची डिझाईन प्रवाशांच्या सेफ्टीसाठी करण्यात आली आहे. म्हणजे एअरबॅग फक्त सीट बेल्ट घालणाऱ्यांचेच संरक्षण करते. एअरबॅगचे डिझाईनही त्याच पद्धतीने केलं आहे. हे सीट बेल्ट नसलेल्या लोकांना सेफ्टी प्रोव्हाइड करत नाही.

सीट बेल्ट बांधणे का आहे आवश्यक ?

सीटबेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. भारतातील बहुतेक कारमध्ये सर्व सीटवर ट्विन एअरबॅग्ज आणि सीटबेल्टसह दिले जातात. अपघाताच्या वेळी जीव वाचवण्यासाठी सीटबेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. सीट बेल्ट घातला नसतानाही एअरबॅग काम करतात. पण कारमध्ये जिथे – जिथे एअरबॅग असतात तिथे SRS असं लिहिलेले असतं. याचा अर्थ सप्लिमेंटरी रेस्ट्रेनिंग सिस्टम (Supplementary Restraint System) सोप्या शब्दात, सांगायचं झालं तर, याचा अर्थ असा आहे की, कारमधील ते एकमेव उपकरण नाही जे तुमचा जीव वाचवेल, म्हणूनच तुम्हाला सीट बेल्ट देखील बांधणे आवश्यक आहे.

सीट बेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम कसं करतं ?

एयरबॅग्स अनेक सेन्सर्सद्वारे कंट्रोल मध्ये असतात. जसे की, इम्पॅक्ट सेन्सर, प्रेशर सेन्सर, ब्रेक प्रेशर सेन्सर. परंतु सीट बेल्ट आणि एअरबॅगमध्ये इलेक्ट्रॉनिक कनेक्शन नसतं, पण एअरबॅग अपघाताच्या वेळी तुमची छाती, चेहरा आणि डोके सुरक्षित ठेवतं. त्यामुळे तुम्हाला जोरदार धक्का बसूनही सीट बेल्ट तुमचे शरीर सीटवर स्थिर ठेवण्यास मदत करते.

त्यामुळे अपघात झाल्यास शरीराची हालचाल थांबते आणि तुम्ही गाडीतून खाली फेकले जात नाही. अशा स्थितीत तुमच्या समोर असलेली एअरबॅग उघडली तर तुमच्या डोक्याचे आणि चेहऱ्याचे संरक्षण होतं. अन् डोक्याचं रक्षण झालं तर तुमचा जीव वाचण्याचे चान्सेस जास्त असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.