10 वी उत्तीर्ण महिलांना दरमहा मिळणार 7000 रुपये, पहा पात्रता, कागदपत्रे अन् ऑनलाईन अर्जाची थेट लिंक..
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने आता विमा सखी योजना सुरु केली असूनया योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या अंतर्गत देशातील महिला – भगिनींना दरमहा 5 ते 7 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मानधन म्हणून दिलं जाणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रेरित करणे हा आहे. या योजनेसाठी सरकारने सुरुवातीला 1,000 कोटींची तरतूद केली आहे.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात विमा सखी योजना हा एक अनोखा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत देशभरातून 50 लाख महिलांना नियुक्तीपत्राचेही वाटप केले आहे. यावरून या योजनेचे महत्त्व आणि सरकारची बांधिलकी दिसून येते. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 5 ते 7 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि कमिशन मिळणार असून त्यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.
या योजनेसाठी कोण करून शकतो अर्ज? कोणती लागतील कागदपत्रे ? कुठे कराल अर्ज ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज ?
विमा सखी योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. 18 ते 70 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमर्यादा महिलांच्या प्रत्येक वर्गासाठी योग्य बनवते, मग ती तरुण असो वा ज्येष्ठ..
विशेष प्रशिक्षणासोबत स्टायपेंडही मिळणार..
या योजनेंतर्गत, महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी पहिली 3 वर्षे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासोबतच महिलांना दरमहा ठराविक स्टायपेंडही दिला जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान, महिलांना विम्याची गुंतागुंत तर समजेलच शिवाय ग्राहक सेवा आणि आर्थिक व्यवस्थापनातही प्राविण्य प्राप्त होण्यास मदत होईल.
करिअर वाढीच्या संधी..
विमा सखी बनल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. पदवीधर विमा सखींनाही भविष्यात एलआयसीमध्ये विकास अधिकारी बनण्याची संधी मिळेल. ही योजना महिलांना केवळ उत्पन्नाचा शाश्वत स्रोतच देत नाही तर त्यांना करिअर वाढीसाठीही प्रेरित करते.
किती असेल कमाई ?
या योजनेनुसार पहिल्या वर्षासाठी महिलांना दरमहा 7 हजार रुपये दिले जातील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये असेल. अशा प्रकारे, एक विमा सखी पहिल्या तीन वर्षांत एकूण 2.16 लाख रुपये कमवू शकते. याशिवाय विमा सखींना त्यांच्या कामावर मिळणाऱ्या कमिशनमुळेही त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे..
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
पॅन कार्ड
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (10 वी उत्तीर्ण)
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
असा करा ऑनलाईन अर्ज.
प्रथम एलआयसी बिमा सखी (LIC Bima Sakhi) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली दिली आहे.
सर्वप्रथम, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइट (licindia.in/test2) वरील “Apply for Bima Sakhi Yojana” वर क्लिक करा.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर ‘एक अर्ज फॉर्म उघडेल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा, जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी. यानंतर कॅप्चा कोड एंटर करा आणि “सबमिट” वर क्लिक करा..
पुढील स्क्रीनवर तुम्हाला राज्य आणि जिल्ह्याचे नाव विचारले जाईल. ते योग्यरित्या भरा आणि “पुढील” वर क्लिक करा..
शहर निवडा: त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या शाखांची नावे दिसतील. तुम्हाला जिथे काम करायचे आहे ती शाखा निवडा आणि “”Submit Lead Form”” वर क्लिक करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर एक मॅसेज दिसेल आणि तुमच्या मोबाइल नंबरवर एक सूचना देखील मिळेल..