अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश ; ‘या’ जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 536 कोटींच्या पिकविम्याचं वाटप होणार, पहा…
शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक देण्याच्या संदर्भातील लढा अखेर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यासह यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर, परभणी जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांना खरिपातील 536 कोटींचा पिक विमा मिळणार आहे.
विमा कंपनीने याबाबत दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. या आधीही हायकोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता परंतु विमा कंपनीने त्याविरोधात त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ती अखेर फेटाळून लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळालं आहे.
2020 मध्ये खरीप हंगामातील रखडलेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय बनला होता. यासाठी शेतकऱ्यांनी विमा रकमेची मागणी करत अनेकवेळा आंदोलन, मोर्चे ही काढले होते. या बाबत गेल्या 2 वर्षापासून सुनावणीची प्रक्रिया सुरु होते.
त्यावर औरंगाबाद खंडपीठाने निकाल देताना शेतकऱ्यांचे 536 कोटी रक्कम सहा आठवड्याच्या आत वर्ग करावे असे, आदेश कंपनीला दिले होते. मात्र पीक विमा कंपनीने हे पैसे शेतकऱ्यांना न देता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
नैसर्गिक आपत्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. परंतु असे अनेक शेतकरी होते त्यांनी 72 तासांच्या आतमध्ये नुकसानभरपाईसाठी दावा नव्हता.
त्यामुळे बजाज अलियान्झ कंपनीने पीक विमा देण्यास टाळाटाळ केली होती. फक्त 20% शेतकऱ्यांनाच पीक विमा दिला होता. त्यामुळे तब्बल 3 लाख 50 हजार शेतकरी वंचित राहिले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं…
अखेर, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळालं असून शेतकऱ्यांना प्रलंबित खरीप : 2020 चा पिकविमा 536 कोटी रुपये तीन आठवड्याच्या आत देण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने बजाज अलियान्झ कंपनीला दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.