शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : तुम्हाला माहित आहे का ? ब्लड सर्कुलेशन खराब होण्यामागची अनेक कारणे असू शकतात. यातील सर्वात मोठं कारण म्हणजे हाय कोलेस्टेरॉल. जसं कि रक्तवाहिन्यांमध्ये जास्त चरबी जमा होते तेव्हा ब्लड सर्कुलेशन विस्कळीत होऊन जातं. कधीकधी हे, हाय किंवा लो- ब्लड प्रेशरमुळे देखील होतं.
शरीरातील ऑक्सिजन रक्ताद्वारे सर्व अवयवांपर्यंत पोहोचतो, परंतु जेव्हा ब्लड सर्कुलेशन खराब किंवा मंद गतीने चालू असते. तेव्हा त्याचा हृदयावर दबाव पडतो. अशा स्थितीत हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा पॅंरलासिस अटॅक झटका येण्याचा धोका वाढतो. पण आता प्रश्न पडतो कि मात्र, आपल्या शरीराचं ब्लड सर्कुलेशन बरोबर आहे कि नाही कसं ओळखावं ? तर जाणून घ्या या 10 लक्षणांद्वारे….
स्लो ब्लड सर्कुलेशनची लक्षणे :-
1. हातपाय अचानक किंवा वारंवार सुन्न होणे.
2. हाता-पायाला मुंग्या येणे किंवा काटा टोचल्याची भावना होणे.
3. हात आणि पायांना अचानक सूज येणे किंवा कायम राहणे.
4. सांधेदुखी, आकडणे, क्रॅक होणे तसेच स्नायूंमध्ये ताण जाणवणे.
5. पायातील नसा किंवा त्वचेवर जखम होणे.
6. काम न करताही थकवा जाणवणे.
7. लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता किंवा चिंताग्रस्त वाटणे.
8. त्वचेचा रंग पिवळ्या किंवा निळ्यामध्ये बदलणे.
9. बद्धकोष्ठता – गॅस आणि अँसिडिटीची होणे.
10.पायांमध्ये वैरिकास व्हेन्स म्हणजेच मोठ्या, काळ्या निळ्या झालेल्या आणि सुजलेल्या नसा दिसणे. काहीवेळा यामुळे पायांमध्ये तीव्र वेदना देखील होतात. या शिरा अनेकदा पाय आणि पायाच्या बोटांवर दिसतात.
बॅड ब्लड सर्कुलेशन असण्याची कारणे :-
ब्लड सर्कुलेशन खराब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे हाय कोलेस्टेरॉल. जेव्हा धमन्यांमध्ये मेणासारखे पदार्थ जमा होते, तेव्हा ब्लड सर्कुलेशन प्रभावित होऊ लागते. याशिवाय, हे हाय किंवा लो ब्लड प्रेशर किंवा हिमोग्लोबिन आणि आयर्नच्या कमतरतेमुळे देखील होते. या आजारांव्यतिरिक्त, इतर अनेक कारणांमुळे देखील ब्लड सर्कुलेशन खराब होतं.
धूम्रपानाच्या सवयीमुळे ब्लड सर्कुलेशन बिघडतं.
जास्त स्ट्रेस घेणे किंवा शारीरिक हालचाली न करणे.
या गोष्टींचीही विशेष काळजी घ्या :-
कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे ब्लड सर्कुलेशन वरही परिणाम होतो.
सतत बसणे किंवा तासनतास एकाच स्थितीत काम करणे.
ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी काय करावे :-
कार्डिओ एक्सरसाइज सह श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. शक्यतो मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय लावा. फुफ्फुसांना ऑक्सिजनचा डोस जितका चांगला तितका ब्लड सर्कुलेशन चांगले राहते. आहारातून मांसाहाराचे प्रमाण कमी करून अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा.जास्त मीठ, तेल आणि ]मसालेदार अन्नापासून दूर रहा.