शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न 1 : फ्रिजपेक्षा माठातलं पाणी पिणं आरोग्यदायी का मानलं जातं ? 

उत्तर : भांड्याच्या पाण्यात अल्कधर्मी (Alkaline) गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचे ph मूल्य संतुलित राहतं. त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं. हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे. त्यामुळे नेहमी माठातलं पाणी प्यावं.

प्रश्न 2 : भारतातलं सर्वात श्रीमंत गाव कोणतं ?  

उत्तर : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात माधापर हे गावं भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे. हे गाव बँक ठेवींच्या बाबतीत जगात सर्वात श्रीमंत आहे. या गावात 17 बँका असून सुमारे 7,600 घरे आहेत. आणि हो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सर्व बँकांमध्ये 92 हजार लोकांचे 5 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा आहेत.

प्रश्न 4 : आपल्या डोळ्यांमधलं पाणी (अश्रू ) नमकीन का असतं ?

उत्तर : आपण रडत असताना आपल्या डोळ्यांमधून अश्रू वाहतं. याची टेस्ट तुम्ही ही कधी केली असेल तर चवीला खारट (नमकीन) लागतं. जर आपण त्यांच्या घटकांबद्दल (Components) बोललो तर त्यात 98% पाणी असतं आणि उर्वरित 2% प्रथिने (Protein) आणि मीठ आयन (Salt ion) आढळतं. आता तुम्ही विचार कराल की, आपल्या डोळ्यांत क्षार नेमके येतात कुठून ?

तर आपलं शरीर हे इलेक्ट्रोलाइट्स आणि सॉल्ट (Salt ion) वापरून मेंदू आणि स्नायूंमध्ये आवश्यक वीज (Electricity) तयार करतं. आपल्या डोळ्यांत निर्माण होणारे अश्रू आपल्या पापण्यांखाली (Lacrimal gland )

आपल्या डोळ्यांत निर्माण होणारे अश्रू आपल्या पापण्यांखाली असलेल्या अश्रू ग्रंथीद्वारे( Lacrimal gland) तयार होतात आणि ते निर्माण होणाऱ्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स (Electrolytes) असतात. म्हणूनच आपले अश्रू खारट (नमकीन) आहेत.

प्रश्न 5 : प्रेग्नंन्सी किटद्वारे स्त्री गर्भवती आहे की नाही हे कसं समजतं ?

उत्तर : मित्रांनो, विविध रहस्य उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान. म्हणून विज्ञान हे जादूपेक्षा कमी नाही असं मानलं जातं. मुळात हे किट महिलांच्या लघवीमध्ये असलेलं ह्यूमन क्रॉनिक गोनाडोट्रॉपिक हार्मोन (Human chronic gonadotropic) म्हणजेच एचसीजी (HCG) हार्मोन तपासण्याचे काम करतं.

जेव्हा एखादी व्यक्ती गर्भवती असते तेव्हाच हा एचसीजी (HCG) तयार होतं. जसा आपण लघवीचा थेंब टेस्ट ट्यूबमध्ये टाकल्याने लघवीमध्ये असलेले एचसीजी (HCG) हे मोबाईल अँटीबॉडीने बॅण्ड केलं जातं आणि पुढे टेस्ट लाइनवर येतं. या टेस्ट लाईन सोबतच एक एन्झाइम (Enzyme) देखील जे रंग बदलण्याचं काम करतं. याच्या मदतीने महिला गर्भवती आहे की नाही हे समजतं.

प्रश्न 6 : भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होती ?

उत्तर : कादंबिनी गांगुली या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. गांगुलीने 1886 मध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. भारतातील राजेशाही निरक्षर असताना त्यांनी पदवी प्राप्त केली. आपल्या संघर्षाने त्यांनी इतिहासात आपलं नाव कोरलं.

प्रश्न 7 : भारतातील सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती कोण ? 

उत्तर : भारतातील सर्वात जास्त शिकलेलया व्यक्तीचं नाव हे डॉ श्रीकांत जिचकर आहे. जिचकार यांचा जन्म 1954 मध्ये नागपूर येथील शेतकरी कुटुंबात झाला होता. अवघ्या 49 वर्षाच्या जीवनात 42 विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकं असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.

त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होत. त्यांनी 1978 साली यूपीएससीची परीक्षा दिली होती. डॉ जिचकार यांचा 2 जून 2004 रोजी नागपूरपासून 60 किमी अंतरावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

प्रश्न 8 : असं कोणतं शहर आहे त्याला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं ?
उत्तर :- अलाहाबाद 
1858 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने शहरातील ब्रिटिश राजेशाहीकडे राष्ट्राचा कारभार सोपवल्यामुळे अलाहाबाद शहराला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं. त्यावेळी अलाहाबाद ही उत्तर-पश्चिम प्रांतांची राजधानी होती.

प्रश्न 9 : जगातील शेवटचा रस्ता कुठे आहे आणि त्याचे नाव काय आहे?
उत्तर :- जगातील शेवटचा रस्ता “नॉर्वेमध्ये आहे आणि त्याचं नावं  E69 असं आहे.

प्रश्न :- ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झालं अन् कधी संपलं ?
उत्तर – ताजमहालचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झालं आणि 1653 मध्ये पूर्ण झालं. ही इमारत बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षांचा कालावधी लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *