शेतीशिवार टीम : 07 सप्टेंबर 2022 : मुरुगप्पा ग्रुप कंपनी ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया (TII) ची उपकंपनी TI क्लीन मोबिलिटी (TCM) ने आज इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश केला. कंपनीने आज चेन्नईमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक तीन चाकी ऑटो मॉन्ट्रा इलेक्ट्रिक 3W लाँच केली.
मॉन्ट्रा इलेक्ट्रिक 3W रेंजची किंमत 3.02 ते 3.42 लाख रुपये (एक्स-शोरूम पोस्ट-सबसिडी) दरम्यान आहे. हे वाहन देशभरातील 100 हून अधिक डीलरशिपवर उपलब्ध असणार आहे.
कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, याला 10kWh क्षमतेचा सर्वोत्तम-इन-सेगमेंट बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो एका चार्जवर 197 Km (ARAI प्रमाणित) पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो.
याशिवाय, हे इलेक्ट्रिक ऑटो 60 Nm चा पीक टॉर्क आणि 55 kmph चा टॉप स्पीड देते. हे उत्तम इकोनॉमीसाठी पार्क असिस्ट तसेच अधिक ड्राइव्ह मोडसह सुसज्ज आहे.
या इलेक्ट्रिक ऑटोबद्दल अधिक माहिती देताना, TICMPL चे व्यवस्थापकीय संचालक के. के पॉल म्हणाले, “हे सॉफ्ट टॉप, हार्ड टॉप आणि लाँग रेंज अशा तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मॉन्ट्रा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर टेलीमॅटिक्स आणि ड्रायव्हरव कम्युटर दोघांसाठी अत्याधुनिक अँपसह डिजिटल फायनान्सिंग, 24 x 7 रोडसाइड असिस्टेंस , 2 वर्षांचा एक्सटेंडेड वॉरंटी ऑप्शन आणि तीन वर्षांचा AMC सह सुसज्ज आहे.
कंपनीने जाहीर केले की, 40 डीलर्स आधीच ऑनबोर्ड आहेत आणि ते FY 2023 च्या अखेरीस 100 ठिकाणी हे वाहन उपलब्ध असणार आहे. या इलेक्ट्रिक व्हीकलच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी आतापर्यंत 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून ते तयार करण्यासाठी 3 वर्षे लागली आहेत.
कंपनी अनेक बॅटरी स्वॅपिंग मॅनुफॅक्चरिंगच्या संपर्कात आहे आणि भविष्यात या टेक्निकलाही समाविष्ट करू शकते, सध्या NMC बॅटरी केमिस्ट्रीचा उपयोग करत आहे.
थ्री व्हीलर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तसेच टेस्ट ड्राइव्हसाठी https://www.montraelectric.com/ लिंकवर क्लिक करा