7th Pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता महागाई भत्त्याची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्त्याचं गिफ्ट देण्याची वेळ आली असून त्यांची ही इच्छा सणासुदीच्या काळात पूर्ण होणार आहे. दसऱ्यापूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देणार आहे.

यावेळी महागाई भत्त्यामध्ये 4% (DA Hike) वाढ करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक – औद्योगिक कामगार (AICPI) च्या आकडेवारीवरून, किती महागाई भत्ता वाढवला जाईल हे निश्चित केलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगाराबरोबर हा महागाई भत्ता (DA) दिला जाणार आहे.

DA किती वाढणार, असा झाला फायनल :-

AICPI-IW (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स- इंडस्ट्रियल वर्कर) च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये निर्देशांक 0.2 अंकांनी वाढून 129.2 वर पोहोचला. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकार या निर्देशांकाचा डेटा वापरते. निर्देशांकात वाढ झाल्यामुळे DA मध्ये 4% वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा दावा तज्ञ करत आहेत. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

DA Arrear चे ही मिळणार पैसे :-

महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता (DA) 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन महागाई भत्ता सप्टेंबर 2022 च्या पगारात दिला जाणार आहे. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही मिळणार आहेत.

नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू मानला जाईल. एकंदरीत नवरात्रीच्या दिवसांत सरकार खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसांत सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे.

पगारात काय पडणार फरक ?

7व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56900 रुपये आहे. 38 टक्क्यांनुसार 18000 रुपयांच्या मूळ पगारावर वार्षिक DA मध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ होईल.

एकूण DA दरमहा 720 रुपयांनी वाढेल. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये होणार आहे. या वेतन ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना 34% च्या तुलनेत 2276 रुपये अधिक मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *