केंद्र सरकारच्या मुंबई – पुणे – हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॅरिडोअर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंतिम आराखडा (DPR) सल्लागार कंपनी इंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडे नुकताच सादर झाला आहे. महामंडळाच्या चौकशीनंतर हा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाणार असल्याचं नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पाेरेशनचे अधिकारी, श्याम चौगुले यांनी सांगितलं आहे.

‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (NHSRCL) देशभरात 8 ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई – नागपूर आणि मुंबई -पुणे हैदराबाद, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असे 3 प्रकल्प आहेत. त्यापैकी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गास ग्रीन सिग्नल मिळाला असून भूसंपादनाच्या कामाला वेग लागला आहे.

या बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला होणार असून राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे सोलापूर या चार जिल्ह्यांतून, कर्नाटकातील एक आणि तेलंगणमधील तीन जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. यामुळे व्यापारविस्तार होऊन नव्या बाजारपेठा उपलब्ध होऊन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते हैदराबाद प्रवासाची वेळ 11 ते ब12 तासांनी कमी होणार असून, प्रवासासाठी फक्त 3 ते 3.30 तास वेळ लागणार आहे. ट्रेनला ठाणे, नवी मुंबईसह पुणे जिल्ह्यात लोणावळा, पुणे आणि बारामती येथे थांबा असणार आहे. यामुळे परिसरातील बाजारपेठांचा मोठा विकास होणार आहे. महाराष्ट्रातील आणि तेलंगणामधील 12 स्टेशन द्वारे हा लोह मार्ग जोडला जाणार आहे.

परंतु मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडार (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्व्हे) सर्वेक्षण सुरू झालं होतं तसेच भूसंपादनाची प्रक्रिया देखील राबवली गेली होती परंतु बारामती, इंदापूर, तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे अजून तरी या प्रकल्पाला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाला नाही.

पहा, 12 स्टेशनची नावे :-

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई (शक्यतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरु होऊन ठाणे, लोणावळा, पुणे, बारामती, कुरकुंभ / दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी (गुलबर्गा), झहीराबाद आणि हैदराबाद

प्रोजेक्ट डिटेल्स, पहा

मॅक्झिमम स्पीड : 350 Kmph
ऑपरेशनल स्पीड : 320 Kmph
अव्हरेज स्पीड : 250 Kmph
ट्रॅक गेज : स्टॅंडर्ड गेज – 1435mm
सिग्नलिंग : DS-ATC
ट्रेन कपॅसिटी : 750 पॅसेंजर
ट्रॅक्शन : 25 KV AC ओव्हरहेड कॅटेनरी (OHE)
सेफ्टी : भूकंप झाल्यास अँटोमॅटिक ब्रेकिंगसाठी त्वरित भूकंप डिटेक्शन आणि अलार्म सिस्टम (UrEDAS)

 संपूर्ण रोड मॅप आणि गावांची नावे पाहण्यासाठी आमच्या व्हाट्स अप ग्रुप ला जॉईन व्हा.. त्या ठिकाणी तुम्हाला    road map alignment मिळेल. 

गृप लिंक :-  https://chat.whatsapp.com/Kn6cBtdXQTr30A9vDNy594

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *