आ. नीलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन न करता अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्यांच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला होता. तशाच पध्दतीने सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीतही लंके हे कोणतेही शक्तीप्रदर्शन करणार नाहीत.

गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा निवडणूकीची तयारी करणाऱ्या आ. नीलेश लंके यांनी निवडणूक दृष्टीपथात आल्यानंतर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राणीताई लंके यांनी मतदारसंघातील गावागावांमध्ये जात शिवविचार पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्या निमित्ताने लंके हे घरोघर पोहचले. त्यापूर्वीही दिवाळी फराळाच्या निमित्ताने लंके यांनी मतदारंसघातील प्रत्येक गावच्या प्रमुुख कार्यकर्त्यांना हंगे येथे निमंत्रीत करून संवाद साधला होता.

अलिकडेेच नगर शहरात शिवपुत्र संभाजी या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या महानाटयाच्या प्रयोगाचे आयोजन करून लंके हे लाखो मतदारांपर्यंत पोहचले. महानाटयाच्या पहिल्या दिवसापासून या प्रयोगांना लाखो नागरीकांनी हजेरी लावल्याने हे महानाटय कमालीचे यशस्वी ठरले. विशेष म्हणजे भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांनी या महानाटयास हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लंके यांनी कार्यकर्त्यांची मने जाणून घेत तांत्रीक अडचण नको म्हणून थेट आपल्या आमदारकीचा पक्षाकडे सुपूर्द करून लंके हे मैदानात उतरले. स्वाभीमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने लंके हे मतदारसंघातील गावागावांमध्ये पुन्हा पोहचले. लंके यांची ही जनसंवाद यात्राही कमालीची यशस्वी झाली. रात्री दहा वाजता यात्रेचा समारोप अपेक्षीत असताना लंके हे पहाटे तीन वाजेपर्यंत गावागावांना भेटी देत होते. उशिरापर्यंत नागरीक लंके यांची वाट पाहत असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह जिल्हयातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नगर शहरात या यात्रेचा समारोप झाला. या सांगता सभेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचे जिल्हयातील नेते एकसंघपणे लंके यांच्या पाठीशी असल्याचा संदेश या सांगता सभेतून देेेेण्यात लंके हे यशस्वी झाले. या पार्श्‍वभुमीवर लंके हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *