शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं अहमदनगरच्या नूतन पालकमंत्रीपदी कोण ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण राज्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने आता वरिष्ठ पातळीवरही नूतन पालकमंत्रीपदाबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपदासह अहमदनगरचे पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा पसरली होती. परंतु आता आज बुधवारी मुंबई राष्ट्रवादी कार्यालयात नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजलं आहे.

अहमदनगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे या बैठकीला नूतन पालकमंत्री उपस्थित राहणार आहे.

पालकमंत्री पदासाठी अहमदनगरचे आधी पालकमंत्रिपद भूषवलेले अन् नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती.

मुुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय, कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते, असेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *