Pune। चाकणच्या तरुणांनी देशात नाव गाजवलं, देशातला पहिला ड्रोन टेस्टिंग मध्ये पास ; माणसाला घेऊन अवकाशात 30 मि.30 Km धावणार
माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन पुण्यातील, चाकण MIDC तील कंपनी सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने विकसित केला आहे. केंद्र सरकार लवकरच भारतीय नौदलात माणसाला घेऊन अवकाशात उडणारा हा ड्रोन समाविष्ट करणार आहे.
या खास टेक्नॉलॉजी असलेल्या ड्रोनला वरुण ‘Varuna’ Drone’ असं नाव देण्यात आलं आहे. या ड्रोनमध्ये 100 किलो वजनासह उड्डाण करण्याची क्षमता आहे. यासोबतच नौदलाचे जवान या ड्रोनद्वारे 25 ते 30 Km चा प्रवास 30 मिनिटांत प्रवास पूर्ण करू शकतात. या ड्रोनचा लवकरच नौदलात समावेश करण्यात येणार आहे.
‘वरुण’ ड्रोन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सक्षम आहे. या ड्रोनमुळे एका ठिकाणावरील वस्तू, माणूस दुसऱ्या ठिकाणी कमी वेळात आणि कमी खर्चात सहज घेऊन जाता येणार आहे. ड्रोन पूर्णपणे अँटोमॅटिक आहे. म्हणजेच नौदलाच्या अधिकाऱ्यांना फक्त त्यात बसावे लागेल, ड्रोनच त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल.या ड्रोनच्या कंपनी स्थरावर चाचण्यांमध्ये तो यशस्वी ठरला आहे.
कंपनीचे सह-संस्थापक बब्बर यांचं म्हणणं आहे की, ड्रोनला हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही लोकांना सुरक्षितपणे उतरवण्यास सक्षम आहे. यात पॅराशूटची सुविधाही आहे, जी आपत्कालीन स्थितीत किंवा बिघाडाच्या वेळी आपोआप उघडते, ज्यामुळे सुरक्षित लँडिंग करायला सोपं जाईल. यासोबतच वरुणचा वापर एअर अँम्ब्युलन्ससाठी आणि दूरवरच्या भागात सामान पोहोचवण्यासाठीही सहज करता येतो.
जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ड्रोनचे प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. त्याचा व्हिडिओ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, या ड्रोनमुळे देशाची पाळत ठेवणे आणि सुरक्षा मजबूत करण्यात मदत होणार आहे. याशिवाय याचा उपयोग मदत आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही होऊ शकतो. नॉन प्रोफिटेबल ऑर्गेनाइजेरशन ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक स्मित शाह यांच्या म्हणण्यानुसार,
देशात ड्रोनला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेले ड्रोनचे प्रामुख्याने तीन उपयोग आहेत, सर्वेक्षण, तपासणी आणि वितरण. हवाई सर्वेक्षणाव्यतिरिक्त, ड्रोनचा वापर पाइपलाइन, पवनचक्क्या इत्यादींच्या तपासणीसाठी, संरक्षणासाठी आणि दुर्गम भागात औषधे आणि आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी केला जातो. याशिवाय एरियल फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफीचाही वापर केला जातो. एवढेच नाही तर ड्रोनचा वापर एअर टॅक्सीसाठीही करणंही शक्य आहे.
India's efforts towards defence modernisation continues with full vigour.#Varuna, India's first indigenously developed human carrying drone will be inducted into @indiannavy soon.
One more step towards making India #AatmaNirbhar in defence sector.#AatmanirbharBharat pic.twitter.com/yN7wwbUyAS
— Bhrugu Baxipatra (@BhruguBJP) October 6, 2022
या आहेत ड्रोनची गाईडलाईन्स :-
नॅनो ड्रोन वगळता सर्व ड्रोन उड्डाण करण्यासाठी, तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA) कडून एक विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त करावा लागेल. लष्करी क्षेत्राजवळ किंवा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात कोणतेही ड्रोन उडवण्यास मनाई आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 5Km आणि उर्वरित विमानतळापासून 3Kmच्या आत ड्रोन उडविण्यास बंदी आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेच्या 25Km च्या आत ड्रोन उडवल्यास तुमच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय ड्रोनच्या रेंजनुसार त्यांना किती उंचीवर उडवता येईल हेही ठरवण्यात आलं आहे. 2016 मध्ये जगातील पहिले मानवी उडणारे ड्रोन ‘The Ehang184’ अमेरिकेत तयार करण्यात आलं होतं. हे एक लहान पर्सनल हेलिकॉप्टर आहे, जे फक्त एक प्रवासी वाहून नेण्यासचं सक्षम आहे.