शेतीशिवार टीम : 29 जुलै 2022 :- पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढलेल्या सोडतीत अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्यांच्या गटांवर आरक्षण पडल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर त्याच प्रवर्गातील काहींना आरक्षणाचा फायदा होणार असल्याने निवडणुकीत संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. या सोडतीतून जिल्हा परिषद गटांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक शाखेचे समन्वयक, उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विनायक राऊत आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सात जागा वाढल्याने नव्या सभागृहात 82 सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ही संख्या 75 इतकी होती. एकूण 82 सदस्यांपैकी विविध प्रवर्गातील मिळून एकूण 41 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
या दिग्गजांना धक्का :-
माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, विवेक वळसे पाटील, शरद लेंडे, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, प्रवीण माने, माजी कृषी सभापती सुजाता पवार, बाबुराव वायकर, शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांना धक्का बसणार असल्याचे सोडतीतून दिसून आले.
यांना मिळणार संधी :-
माजी अध्यक्ष देवराम लांडे, निर्मला पानसरे, माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, माजी महिला बालकल्याण सभापती सुनीता गावडे, वैशाली पाटील, पूजा पारगे, मावळत्या सभागृहातील काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, अनुभवी सदस्य चंद्रकांत बाठे, आशा बुचके, वीरधवल जगदाळे यांना संधी मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे असे असणार गटनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे :-
*** जुन्नर तालुका जिल्हा परिषद गट :-
1. जुन्नर डिंगोरे :- उदापूर खुला
2.जुन्नर खामगाव :- तांबे खुला
3.जुन्नर पाडळी :- येणेरे खुला (महिला)
4.जुन्नर :- धालेवाडीतर्फे हवेली- सावरगाव खुला (महिला)
5.जुन्नर ओतूर :- उंब्रज नं . १ ओबीसी
6.जुन्नर आळे :- पिंपळवंडी एसटी (महिला)
7.जुन्नर राजुरी :- बेल्हे खुला (महिला)
8.जुन्नर बोरी बु. :- खोडद एसटी (महिला)
9.जुन्नर नारायणगाव :- वारुळवाडी (ओबीसी)
*** आंबेगाव तालुका जिल्हा परिषद गट :-
1.आंबेगाव शिनोली :- बोरघर खुला (महिला)
2.आंबेगाव :- आंबेगाव – पेठ खुला (महिला)
3.आंबेगाव कळंब :- चांडोली बु. एसटी (महिला)
4.आंबेगाव पारगावतर्फे अवसरी :- जारकरवाडी खुला (महिला)
5.आंबेगाव अवसरी बु. पिंपळगाव तर्फे :- म्हाळुंगे (एसटी)
*** शिरूर तालुका जिल्हा परिषद गट :-
1.शिरूर टाकळी हाजी :- कवठे यमाई ओबीसी
2.शिरूर -शिरूर ग्रामीण :- निमोणे एसटी
3.शिरूर कारेगाव :- रांजणगाव गणपती खुला
4.शिरूर करंदी :- कान्हूर मेसाई खुला
5.शिरूर सणसवाडी :- कोरगाव खुला (महिला)
6.शिरूर तळेगाव ढमढेरे :- शिक्रापूर ओबीसी
7.शिरूर न्हावरा :- निमगाव म्हाळुगी खुला
8.शिरूर वडगाव रासाई :- मांडवगण फराटा एसटी
*** खेड तालुका जिल्हा परिषद गट :-
1.खेड नायफड :- औदर ओबीसी (महिला)
2.खेड वाडा :- सातकर स्थळ खुला
3.खेड रेटवडी :- कन्हेरसर खुला (महिला)
4.खेड पिंपळगाव तर्फे खेड :- काळूस खुला (महिला)
5.खेड कडूस :- शिरोली खुला (महिला)
6.खेड पाईट :- पिंपरी बु. खुला (महिला)
7.खेड म्हाळुंगे :- आंबेठाण ओबीसी
8.खेड नाणेकरवाडी :- मेदनकरवाडी ओबीसी (महिला)
9.खेड कुरुळी :- मरकळ ओबीसी (महिला)
*** मावळ तालुका जिल्हा परिषद गट :-
1.मावळ टाकवे बु.- नाणे खुला
2.मावळ खडकाळे – वराळे एससी
3.मावळ कुरवंडे – कार्ला खुला (महिला)
4.मावळ कुसगाव बु. – सोमाटणे खुला (महिला)
5.मावळ चांदखेड – काले खुला (महिला)
6.मावळ इंदुरी – तळेगाव दाभाडे ग्रामीण ओबीसी
*** पुरंदर तालुका जिल्हा परिषद गट :-
1.पुरंदर गराडे :- दिवे खुला (महिला)
2.पुरंदर पिसर्वे :- माळशिरस खुला
3.पुरंदर कोळविहिरे :- बेलसर खुला (महिला)
4.पुरंदर मांडकी :- परिंचे खुला पुरंदर निरा – शिवतक्रार- वाल्हे खुला ( महिला )
*** मुळशी तालुका जिल्हा परिषद गट :-
1.मुळशी कोळवण :- माले ओबीसी (महिला)
2.मुळशी हिंजवडी :- कासारसाई खुला (महिला)
3.मुळशी माण :- कासार आंबोली खुला
4.मुळशी पिरंगुट :- भुगाव ओबीसी (महिला)
*** हवेली तालुका जिल्हा परिषद गट :-
1.हवेली पेरणे :- लोणीकंद ओबीसी (महिला)
2.हवेली वाडेबोल्हाई :- कोरेगाव मूळ खुला
3.हवेली उरुळी कांचन :- सोरतापवाडी खुला (महिला)
4.हवेली कदमवाक वस्ती :- थेऊर खुला (महिला)
5.हवेली लोणीकाळभोर :- कुजीरवाडी ओबीसी (महिला)
6.हवेली खेडशिवापूर :- खानापूर खुला
*** दौंड तालुका जिल्हा परिषद गट :-
1.दौंड तालुका दौंड राहू :- खामगाव (खुला)
2.दौंड पारगाव :- पिंपळगाव एससी (महिला)
3.दौंड गोपाळवाडी :- कानगाव खुला
4.दौंड लिंगाळी :- देऊळगाव राजे खुला
5.दौंड खडकी :- राजेगाव एससी (महिला)
6.दौंड पाटस :- कुरकुंभ खुला
7.दौंड वरखंड :- बोरी पारधी खुला
8.दौंड यवत :- बोरीभडक ओबीसी (महिला)
***वेल्हे तालुका जिल्हा परिषद गट :-
1.वेल्हे विंझर – पानशेत ओबीसी
2.वेल्हे वेल्हे बु. :- वांगणी खुला
***भोर तालुका जिल्हा परिषद गट :-
1.भोर वेळू :- नसरापूर ओबीसी
2.भोर भोंगवली :- संगमनेर खुला
3.भोर भोलावडे :- शिंद खुला
4.भोर कारी :- उत्रौली खुला
*** बारामती तालुका जिल्हा परिषद गट :-
1.बारामती सुपा :- काहाटी ओबीसी (महिला)
2.बारामती काटेवाडी :- शिर्सुफळ ओबीसी
3.बारामती गुणवडी :- पणदरे एससी (महिला)
4.बारामती मोरगाव :- मुढाळे खुला (महिला)
5.बारामती निंबुत :- वाघळवाडी ओबीसी
6.बारामती वडगाव निंबाळकर :- सांगवी एससी
7.बारामती निरा वागज – डोर्लेवाडी एससी (महिला)
***इंदापूर तालुका जिल्हा परिषद गट :-
1.इंदापूर भिगवण :- शेटफळगढे खुला (महिला)
2.इंदापूर अंथुर्णे :- बोरी ओबीसी (महिला) इंदापूर
3.पळसदेव :- बिजवडी ओबीसी (महिला)
4.इंदापूर वडापुरी :- माळवाडी एससी
5.इंदापूर निमगाव केतकी :- शेळगाव खुला
6. इंदापूर सणसर :- बेलवडी खुला (महिला)
7. इंदापूर लासुर्णे :- वालचंदनगर ओबीसी
8.इंदापूर काटी :- वरखुटे खु. एससी
9.इंदापूर बावडा – लुमेवाडी खुला