आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान 15 सप्टेंबरपासून वितरित केलं जाणार होतं. या आधी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना बंडखोर – भाजप सरकारकडून विधिमंडळात 25 हजार 826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्याही सादर करण्यात आल्या होत्या.

यात 27 जुलै 2022 रोजी शासन निर्णय घेऊन महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी 4 हजार 700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती, परंतु निधी / हप्ता वितरित करण्यास मान्यता मिळाली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला होता.

परंतू, 16 सप्टेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय घेऊन अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2022-23 या वित्तीय वर्षासाठी रु. 4700.00 निधींपैकी पहिला हप्ता हा 2350.00 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.

परंतु, जे पात्र शेतकरी आहेत अन् त्यांचे आधार E-KYC व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 19 सप्टेंबरपासून 50 हजार रु. खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं. तसेच लाभार्थी याद्या बँकेच्या माध्यमातून बँकेचे मुख्यालय, सोसायटी या ठिकाणी प्रकाशित केल्या जातील असं अपडेट देण्यात आलं होतं. परंतु बँकेकडे गेले असता बँकेनेही अरेरावीची व उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत भ्रमनिरासचं झाला आहे. त्यामुळे हे अनुदान कधी जमा होणार ? हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तर मित्रांनो, याबाबत सर्वात मोठा घोळ हा बँकांनी घातला आहे. बँकांनी अनेक अपात्र किंवा पात्र असूनही नाव न घेतल्याचा सर्व चुकीचा डाटा हा महसूल विभागाकडे पाठवला आहे.

त्यामध्ये लातूर, नांदेड, संभाजीनगर, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पात्र झालेल्या हजारो – लाखो शेतकऱ्यांच्या चुकीचा डाटा हा बँकांच्या माध्यमातून महसूल विभागाकडे गेला आहे. यामध्ये 18 लाख 65 हजार पेक्षा जास्त जे पात्र शेतकऱ्यांमधील जवळजवळ 7 लाख 42 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांची चुकीची माहिती गेल्याने महसूल विभागाला या याद्या mjpsky.maharashtra.gov.in या पोर्टल वर याद्या प्रकाशित करण्यात अडचणी येत आहे.

आता पुन्हा एकदा महसूल विभागाने या याद्या 28 – 29 सप्टेंबरला परत बँकांकडे पाठवण्यात आल्या आहेत. आता या याद्या पुन्हा एकदा बँकेला व्हेरिफाय कराव्या लागणार असून त्या महसूल विभागाला परत पाठविण्यासाठी चे निर्देश देण्यात आलेले आहेत. या याद्या पुन्हा एकदा व्हेरिफाय केल्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाच्या पोर्टलवर लवकरात लवकर अपलोड करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

आता या याद्या पोर्टलवर अपडेट केल्यानंतर आधार व्हेरिफिकेशन e -KYC केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपर्यंत जमा होतील अशी शक्यता आहे.

या याद्यांमध्ये, संभाजी नगर, नांदेड, लातूर, पुणे सातारा अहमदनगर जिल्ह्यांमधून जवळपास 60 ते 70% माहिती चुकीची आढळून आली आहे. त्यामुळे आता या याद्या व्हेरीफाईड करण्याचं मोठं आव्हान बँकांना दिलं गेलं आहे. या याद्या आपण पात्र शेतकरी, योग्य माहिती, चुकीची माहिती याप्रमाणे जिल्हानिहाय पाहणार आहोत…

अकोला जिल्हा :- 

पात्र शेतकरी :- 54,451
योग्य माहिती :- 28,201
चुकीची माहिती :- 26,250

अमरावती जिल्हा

पात्र शेतकरी :- 20,308
योग्य माहिती :- 20,168
चुकीची माहिती :- 140

संभाजीनगर जिल्हा

पात्र शेतकरी :- 49,860
योग्य माहिती :- 0
चुकीची माहिती :- 49,860

बीड जिल्हा

पात्र शेतकरी :- 8,773
योग्य माहिती :- 8,604
चुकीची माहिती :- 169

भंडारा जिल्हा

पात्र शेतकरी :- 56,197
योग्य माहिती :- 51,199
चुकीची माहिती :- 4,998

बुलढाणा जिल्हा

पात्र शेतकरी :- 4,905
योग्य माहिती :- 4,905
चुकीची माहिती :- 0

चंद्रपूर जिल्हा

पात्र शेतकरी :- 57,275
योग्य माहिती :- 17,328
चुकीची माहिती :- 39,947

धुळे जिल्हा

पात्र शेतकरी :- 17574
योग्य माहिती :- 17,277
चुकीची माहिती :- 296

गडचिरोली जिल्हा

पात्र शेतकरी :- 16,538
योग्य माहिती :- 16,312
चुकीची माहिती :- 256

गोंदिया जिल्हा

पात्र शेतकरी :- 29,590
योग्य माहिती :- 27,385
चुकीची माहिती :- 2,205

जळगाव जिल्हा

पात्र शेतकरी :- 74,710
योग्य माहिती :- 29,239
चुकीची माहिती :- 45,471

जालना जिल्हा

पात्र शेतकरी :- 26,223
योग्य माहिती :- 26,223
चुकीची माहिती :- 0

कोल्हापूर जिल्हा

पात्र शेतकरी :- 3,01,289
योग्य माहिती :- 2,93,287
चुकीची माहिती :- 7,994

लातूर जिल्हा

पात्र शेतकरी :-1,63,121
योग्य माहिती :- 1,63,121
चुकीची माहिती :- 0

धाराशिव जिल्हा

पात्र शेतकरी :- 54,096
योग्य माहिती :- 50,029
चुकीची माहिती :- 4,067

परभणी जिल्हा

पात्र शेतकरी :- 55,111
योग्य माहिती :- 53,841
चुकीची माहिती :- 1,272

पुणे जिल्हा

पात्र शेतकरी :- 2,67,378
योग्य माहिती :- 91,164
चुकीची माहिती :- 1,40,214

रत्नागिरी जिल्हा

पात्र शेतकरी :- 21,568
योग्य माहिती :- 4,631
चुकीची माहिती :- 16,967

सांगली जिल्हा

पात्र शेतकरी :- 1,60,733
योग्य माहिती :- 1,59,670
चुकीची माहिती :- 1,067

सातारा जिल्हा

पात्र शेतकरी :- 3,69,137
योग्य माहिती :- 1,60,928
चुकीची माहिती :- 1,90,209

सिंधुदुर्ग जिल्हा

पात्र शेतकरी :- 20,077
योग्य माहिती :- 19,447
चुकीची माहिती :- 630

सोलापूर जिल्हा

पात्र शेतकरी :- 43,743
योग्य माहिती :- 42,808
चुकीची माहिती :- 935

ठाणे जिल्हा

पात्र शेतकरी :- 27,055
योग्य माहिती :- 648
चुकीची माहिती :- 26,407

अहमदनगर जिल्हा

पात्र शेतकरी :- 2,60,230
योग्य माहिती :- 2,30,137
चुकीची माहिती :- 30,093

नांदेड जिल्हा

पात्र शेतकरी :- 54,684
योग्य माहिती :- 0
चुकीची माहिती :- 54,684

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *