संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यांनातर संभाजी ब्रिगेड अहमदनगर दक्षिणच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांना वेळ देऊ विविध प्रश्नांच्यावर चर्चा केली तसेच शेतकऱ्यांच्यासाठी सदैव लढत राहणार असल्याचे सांगितले.
साकळाइ पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या कांदा,दूध,कापूस,सोयाबीन यासारख्या पिकांना हमीभाव आणि शेतकऱ्यांना स्वामींनाथ आयोगा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.लंके यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले
अहमदनगर दक्षिण मधील संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष शे.आघाडी संग्राम देशमुख,अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे,जिल्हा संघटक गणेश पारे,श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नानाजी शिंदे,कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे,केशव देशमुख ,मयूर धनवडे महेश लाहोर ,मुन्ना मुंडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.
Agriculture News in Marathi, latest Agriculture news, Agriculture news and headlines, Agriculture market updates, Agriculture technology, Agriculture product, Indian Agriculture, Food Processing, Crops Production, Agri Policy, Trade in Agriculture, Farming, News on Crop Pricing and Agri Industry online Agriculture information