शेतीशिवार टीम, 3 जानेवारी 2022 : NCBचे वादग्रस्त ठरलेले झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. NCBत झोनल डायरेक्टर पदावर कार्यरत राहण्यासाठी त्यांना कोणतीही मुदतवाढ मिळालेली नाही म्हणजेच त्यांनी आता NCBतुन काढण्यात आलं आहे. वानखेडे यांनी NCB मधील वाढवून घेतलेली 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे.
समीर वानखेडे हे आयआरएस (IRS) अधिकारी असून ते मुंबईतील ड्रग्ज प्रकरणांच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यावर तो आणखी चर्चेत आला. केंद्र सरकार त्यांना पुन्हा मुदतवाढ देईल अशी अटकळ यापूर्वी वर्तवली जात होती परंतु तसं होऊ शकलं नाही.
DRI विभागात पुन्हा बदली :-
आता त्यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क (DRI) विभागात बदली कार्यांत आली आहे. समीर वानखेडे आधीच त्या खात्यावर कार्यरत होते. डीआरआय (DRI) विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबी (NCB) मध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आलं होतं. आता त्याला पुन्हा डीआरआयकडे (DRI)
पाठवण्यात आलं आहे.
कोण आहे समीर वानखेडे :-
समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे महसूल सेवेतील अधिकारी आहेत. सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना प्रथम मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. येथे त्यांनी जबरदस्त काम केले, त्यामुळे त्यांना नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आले. ड्रग्जशी संबंधित प्रकरणे पकडण्यात तो माहीर असल्याचे बोलले जातं. दिल्लीनंतर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या जबाबदारीने मुंबईला पाठवण्यात आलं.
येथे त्यांना एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर करण्यात आलं. पदभार स्वीकारताच त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू केला. यादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाची त्यांनी चौकशी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 17 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.
मंत्री नवाब मालिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप :
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण असल्याचा आरोप समीर वानखेडेंवर केला होता. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांवरुन देखील वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं होतं.