बळीराजाला मोठा दिलासा ! अतिवृष्टी नुकसान भरपाईही उद्यापासून खात्यात होणार जमा ; हेक्टरी 36,000 रु. मिळणार मदत, पहा जिल्हानिहाय लाभार्थी यादी
शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : आजच्या काळात हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम शेतीवर झाला आहे. 2022 मध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळाने अनेक राज्यांमध्ये उभी पिके जवळजवळ नष्ट झाली होती, तर बहुतेक शेत क्षेत्र पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईसाठी अनेक प्रयत्न केले जातात. या पार्शवभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची रक्कम 15 सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार आहे. या योजनेशी संबंधित काही अटी व शर्तींनुसार उस्मानाबाद जिल्ह्याला या नुकसान – भरपाई मदतीतून बाहेर ठेवण्यात येणार आहे.
प्रति हेक्टरी मिळणार इतकी मदत…
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी मोबदला दिला जाईल. नियमानुसार, जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदतीची रक्कम दिली जाणार आहे, त्याअंतर्गत शेतकर्यांना पीकानुसार 27 हजार ते 36 हजार प्रति हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेत महाराष्ट्र राज्य शासनाबरोबरच आपला व्यवस्थापन विभाग आणि केंद्र सरकारही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दराने मदतीची रक्कम अदा करणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार हा लाभ :-
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात जुलै 2022 मध्ये झालेल्या मोसमी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. या भागात सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक पाऊस झाला असून, त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
राज्य सरकारने वाढवली दुप्पट दराने मदत…
2022 च्या मान्सूनमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास दुप्पट केली आहे.
* जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- रू.13600/- 3 हेक्टरच्या मर्यादेत.
*बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- रू.27,000/- 3 हेक्टरच्या मर्यादेत.
*बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- रू. 36,000/- 3 हेक्टरच्या मर्यादेत.
2022 च्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे जास्त नुकसान :-
2022 चा पावसाळा शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीचा घेऊन आला. देशातील बहुतांश राज्यात कमी पावसामुळे भाताची पेरणी होऊ शकली नाही, तर महाराष्ट्रासारख्या राज्यात अतिवृष्टीमुळे उभी पिके पाण्याखाली गेली. या समस्येचा सर्वात वाईट परिणाम सोयाबीन आणि कापूस उत्पादनावर झाला आहे.
वृत्तानुसार, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. विशेषत: सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून पीक नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून थोडी -फार का होईना मुक्तता नक्कीच मिळेल अशी अशा करूया…
नुकसान भरपाई लाभार्थी यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या व्हेबसाइटवर जाऊन दस्तऐवज या ऑप्शनवर क्लिक करून ,2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी’ यावर सिलेक्ट करून आपलं नाव चेक करा.
उदाहरणार्थ…
nanded.gov.in / aurangabad.gov.in या व्हेबसाईट्वर जा.
या ठिकाणी आल्यानंतर होम पेज दिसेल मराठी भाषा सिलेक्ट करा
केल्यानंतर आपल्याला दस्तऐवज यावर क्लिक करुन तुम्ही तालुकानिहाय अतिवृष्टी नुकसान भरपाई भोकर तालुक्याची यादी आपण डाऊनलोड करू शकता…
जिल्हानिहाय कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला पहा ‘हा’ शासन निर्णय
शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा