शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : राज्यात गेल्या 2 दिवसांत रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळाली होती परंतु आज पुन्हा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आहे असून राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. तर यातील 86 टक्के रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे की, सेल्फ किटद्वारे टेस्ट केल्यानंतर काही लोकं टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित विभागाला कळवत नाही. त्यांनी होम क्वारंटाईन राहवं परंतु याबाबत आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी.
आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या. तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पहा…
जिल्ह्यात आज 93 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 52 हजार 56 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.45 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 448 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2040 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 125 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 253 आणि अँटीजेन चाचणीत 70 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 50, अकाले 07, नगर ग्रा. 20, नेवासा 01, पारनेर 04, पाथर्डी 07, राहुरी 02, संगमनेर 02, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 03, कॅन्टो नमेंट बोर्ड 11, मिलिटरी हॉस्पिटल 07, इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 79, अकोले 15, जामखेड 01, कर्जत 02, कोपरगाव 11, नगर ग्रा. 09, नेवासा 06, पारनेर 07, पाथर्डी 06, राहाता 44, राहुरी 10, संगमनेर 07, शेवगाव 05, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 14, कॅन्टो्नमेंट बोर्ड 03, इतर जिल्हा 19 आणि इतर राज्यं 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 70 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 15, अकोले 04, कर्जत 03, कोपरगाव 04, नगर ग्रा.06, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 15, राहाता 08, राहुरी 03, शेवगांव 03, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 03 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 13, कर्जत 06, कोपरगाव 01, नगर ग्रा 02, नेवासा 04, पाथर्डी 05, राहाता 18, राहुरी 03, संगमनेर 12, शेवगांव 01, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : 3,52,056
उपचार सुरू असलेले रूग्ण : 2040
पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7157
एकूण रूग्ण संख्या : 3,61,253
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.