शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आज सकाळपासून समोर येत आहेत. या बातमीने अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांची मनं तुटली आहेत. खरं तर गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र दिसले नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दोघांमध्ये मतभेद होऊ नयेत आणि लवकरच दोघांनीही अशा बातम्यांवर मौन सोडावे, अशी प्रार्थना चाहत्यांकडून होत होती. अर्जुन कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेकअपच्या बातमीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अर्जुनने अफवांवर सोडलं मौन :-
अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शन वाचण्याआधीच तुम्हाला समजेल की, दोघांमध्ये सर्व काही पाहिल्यासारखंच आहे. हा फोटो शेअर करत अर्जुनने लिहिले की, ‘अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा आनंदी रहा.. सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम….अर्जुन कपूरच्या या पोस्टवर बॉलीवूडशी संबंधित अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
https://www.instagram.com/p/CYoT_TKI0MT/?utm_source=ig_web_button_share_sheet
अर्जुन कपूरप्रमाणे मलायका अरोरानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अद्याप काहीही पोस्ट केलेले नाही. अभिनेत्रीने अर्जुनच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून स्पष्ट केले आहे की, तिच्या बाजूनेही सर्व काही ठीक आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाच्या बातम्यांवर दोघेही नेहमीच मौन बाळगतात, मात्र लवकरच दोघेही सात फेरे घेऊ शकतात असे मानलं जात आहे. सध्या त्यांच्या चाहत्यांसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोघे विभक्त झालेले नाहीत.