पशुपालकांसाठी खुशखबर ! प्रति गाय 40,783 रुपये तर प्रति म्हैस 60,249 रुपये मिळतंय कर्ज, पहा पात्रता, कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..
देशातील ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या सरकारी योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसायाशी संबंधित कर्ज देखील दिले जात आहे. तेही फक्त 4 टक्के व्याजदराने. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, सरकारकडून शेतकऱ्यांना पशु किंवा पशुपालन व्यवसायासाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. त्याच वेळी, 1.60 लाख रुपयांचे कर्ज हमीशिवाय म्हणजेच तारणमुक्त दिले जाते.
विशेष बाब म्हणजे हे तारणमुक्त कर्ज पशुपालक/शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजदराने दिले जाते. जर तुम्हाला पशुपालन किंवा पशु व्यवसायातून स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे पशु किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. चला, तर या लेखाच्या मदतीने पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.
पशु किसान क्रेडिट कार्डवरील कर्जावर किती मिळते सबसिडी ?
पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत, शेतकऱ्यांना पशुपालनासाठी केवळ 4 टक्के व्याजावर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. खरे तर बँकेकडून, हे कर्ज शेतकऱ्यांना 9 टक्के दराने दिले जाते. मात्र या कर्जावर सरकार 2 टक्के सबसिडी देते. यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जाची परतफेड केल्यास 3% अधिक व्याज सवलत मिळते. अशा प्रकारे, हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजदराने मिळू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना हे कर्ज 5 वर्षांच्या आत मूळ रक्कम आणि व्याजासह परत करावे लागणार आहे.
पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पशूंसाठी कर्ज..
पशु किसान क्रेडिट कार्डवर, पशुपालक आणि शेतकऱ्यांना पशु किंवा पशु व्यवसायाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज मिळते. हे कर्ज फक्त अशा शेतकऱ्यांना दिले जाते. ज्यांना स्वतःच्या जमिनीवर जनावरांसाठी गोठा किंवा कुंपण बनवायचे आहे आणि स्वतःचा पशुपालन व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यांच्यासाठी या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही हमीशिवाय 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तुम्ही पशु किसान कार्ड अंतर्गत गाय-म्हशी खरेदी केल्यास, तुम्हाला प्रति गाय 40,783 रुपये, प्रति म्हैस 60,249 रुपये कर्ज मिळू शकते. त्याच वेळी, सरकार पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे मेंढ्या आणि शेळ्यांसाठी 4,063 रुपये, कुक्कुटपालनासाठी 720 रुपये आणि डुक्कर खरेदीसाठी 16,237 रुपये कर्ज दिले जाते.
पशु क्रेडिट कार्ड ऑफर करणाऱ्या टॉप बँका..
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारद्वारे नाबार्ड (नॅशनल बँक फॉर अँग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) अंतर्गत चालविली जात आहे. या योजनेचा उद्देश कृषी, मत्स्यपालन आणि पशुपालन यांसारख्या क्षेत्रांतील कर्जाच्या गरजा कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण करणे हा आहे. योजनेत शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे औपचारिक कर्ज दिले जाते. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे प्राण्यांचे KCC कार्ड असणे अनिवार्य आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अँक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेसह इतर बँकांशी संपर्क साधून तुम्ही बनवलेले हे कार्ड मिळवू शकता. यासाठी तुम्हाला एक पानाचा अर्ज भरावा लागेल आणि तो तुमच्या सर्व कागदपत्रांसह बँकेत जमा करावा लागेल. पूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तुम्हाला फक्त 14 दिवसांच्या आत पशु किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल.
पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..
पशु किसान क्रेडिट कार्ड देशातील कोणताही नागरिक जो शेती आणि पशुपालनाशी संबंधित व्यवसाय करतो ते बनवू शकतो. पशु किसान क्रेडिट कार्डसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडे जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच जनावरांचा विमाही असावा. इच्छुक लाभार्थीचा CIBIL स्कोअर चांगला असेल तरच पशु किसान क्रेडिट कार्डवर कर्ज दिले जाईल. कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला ओळखपत्र, आधार, अधिवास प्रमाणपत्र, पशु विमा प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
पशु किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी येथे करा अर्ज..
इच्छुक पशुपालक शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. याशिवाय, पीएम किसान सन्मान निधी पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करून, विनंती केलेली सर्व माहिती भरून, तुम्ही ती बँकेच्या शाखेत जमा करू शकता. तुमचे पशु किसान क्रेडिट कार्ड बँकेकडून 14 दिवसांत जारी केले जाईल.
सध्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी व पशुसंवर्धन विभागाशीही संपर्क साधू शकता..