राज्य सरकारने शेतीशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. परंतु माहितीअभावी शेतीतील मोठा वर्ग त्यांचा लाभ घेण्यापासून आजही वंचित आहे. महाराष्ट्र राज्य शासनाची शेतकर्यांना आधुनिक मशीनरी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत (कृषी यांत्रिकीकरण योजना) ची सुरुवात केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत शेतीसाठी लागणाऱ्या मशीन्स खरेदीवर सब्सिडी मिळत आहे. या स्कीमद्वारे शेतकरी आपल्याला लागणाऱ्या आवश्यक स्वयंचलित यंत्र कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. अश्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतात.
या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार टॅक्टर, ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बैलचलित अवजारे, स्वयंचलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, वखर इत्यादी यंत्रांसाठी सब्सिडी देत आहे. सरकारच्या या पाऊलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर होणारच आहे मात्र जगभरातील आधुनिक युगाशी ताळमेळ घालता येणार आहे.
आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रगत प्रकारच्या कृषी यंत्रांची गरज आहे. हे लक्षात घेऊन वेळोवेळी देशातील राज्य सरकारे शेतकऱ्यांच्या हिताच्या अशा योजना राबवत असतात. कृषी यांत्रिकीकरण योजना ही देखील महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
कोणत्या मशीनवर कोणाला, किती अनुदान :-
महाराष्ट्र सरकारच्या वतीने,नांगर पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर यांसारख्या कृषी यंत्रांवर सामान्य श्रेणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळेल. त्याच वेळी, SC/ST/अत्यंत मागासवर्गीयांना जास्तीत जास्त 75% अनुदान मिळेल.
त्याचप्रमाणे टॅक्टरसाठी (40 HP पर्यंत) जनरल प्रवर्गासाठी 1 लाख रुपये अनुदान दिलं जातं तर, SC/ ST प्रवर्गासाठी 1 लाख 25 हजारांचे अनुदान दिलं जातं.
या 14 कृषी यंत्रांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. . .
2. पॉवर टिलर (8 HP किंवा अधिक)
3. पंपसेट (7.5 HP)
4. झिरोटील सीड ड्रिल, शुगरकेन कटर प्लांटर, रीपर, बाइंडर
5. पॉवर थ्रेशर
6. विनिंग फॅन, चीफ कटर (मॅन्युअल)
7. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर
8. एरो ब्लास्ट स्प्रेअर
9. रोटाव्हेटर
10. सीडड्रिल / झिरोटील सीडड्रिल / मल्टी क्राफ्ट प्लांटर / रिज फॅरो प्लांटर
11. नॅपसॅक स्प्रेअर / फूट स्प्रेअर / पॉवर स्प्रेअर
12. लेजर लँड लेव्हलर
13. पंप सेट
14. स्प्रिंकलर सेट
आवश्यक कागदपत्रे :-
कृषी यंत्रावरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ उतारा, तुमचा जातीचा दाखला, बँक पासबुक, आणि आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लॉटरी लागल्यानंतर भासणार आहे. अर्ज नोंदणीसाठी, महाराष्ट्र सरकारच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे तो तुम्ही CSC सेंटरवरही जाऊन करून शकता.
पीक फवारणी यंत्र योजना : 2022 | पीक फवारणी यंत्रावर मिळवा 3000 ते 1 लाख 25000 पर्यंत अनुदान