राज्यातील तरुणांसाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. अशीच एक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येते. यामध्ये 10 लाखांच्या मर्यादेत असणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ करून 15 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्ज मर्यादा वाढवल्यामुळे लाभार्थींना कर्जाच्या हप्त्यांमध्ये सुलभता राहावी, म्हणून कर्ज परताव्याचा कालावधी सुद्धा 5 वर्षांवरून 7 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हा विषय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून नियोजन विभागाकडे 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल रु.1000 कोटींचा निधी वाढवला आहे. यातील 300 कोटींचा निधी हा निधी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मराठी समाजातील युवकांना उद्योग उभा करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? पात्रता? कागदपत्रे ? अटी शर्ती काय आहेत या बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा…
या योजनेकरिता अटी आणि शर्ती…
1) योजनेअंतर्गत लाभ घेणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
2) महामंडळाच्या ही योजना खुल्या प्रवर्गासाठी व ज्या प्रवर्गाकरीता आहे ज्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ तत्त्वात नाही, अशांकरीता आहेत.
3) 1 जानेवारी, 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत – जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.
4) लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखाच्या आत असावे. ( जे रु. 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक I.T.R. ( पती व पत्नीचे) अथवा लाभार्थ्याचे व त्यांच्या कुटूंबातील सर्व कमवत्या व्यक्तींचे I.T.R. आवश्यक असावे.
5) या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
6) दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय कर्ज मंजूर करीत असताना तो व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा .
7) गट असल्यास कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापना केलेल्या एफ.पि.ओ. (FPO) व दिव्यांग गटांना वयोमर्यादेची अट लागू असणार नाही.
जर गट असल्यास महामंडळाच्या योजने अंतर्गत भागीदारी संस्था / सहकारी संस्था / बचत गट / एल.एल.पी. / कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील.
8) खालील व्यवसायांना योजनेअंतर्गत व्याज परतावा देण्यात येत नाही…
कृषी
वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
सोनेतारण कर्ज
शैक्षणिक कर्ज
9) उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा.
खालील उद्योगासाठी हे कर्ज मिळेल…
दुग्ध व्यवसाय / डेरी
गाय – म्हैस गोठा
शेली पालन
कुक्कुटपालन
चिकन सेंटर
मसाल्याचे पदार्थ तयार करणे.
अगरबत्ती तयार करणे
टॅक्सी व्यवसाय
रिक्षा व्यवसाय
भाजीपाला विक्री व व्यवसाय
मेडिकल स्टोअर्स
सायबर कॅफे व्यवसाय
ट्रान्स्पोर्ट व्यवसाय ( तीन / चारचाकी वाहन
पार्लर ( जेन्टस् / लेडीज )
होटल व्यवसाय
कापड दुकान व्यवसाय
किराणा दुकान व्यवसाय
झेरॉक्स / प्रिन्टर्स व्यवसाय कम्प्युटर इन्सिटट्यूट
द्रोण पत्रावळी व्यवसाय
फळ विक्रेता व्यवसाय
टेलरिंगचा व्यवसाय
तसेच इतर लघु उद्योगांतर्गत सर्व उद्योग व धंद्यासाठी..
कागदपत्रे :-
मराठा असल्याचा दाखला / जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक..
कोटेशन / प्रकल्प अहवाल
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यानंतर, प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे :-
1. आधार कार्ड
2. मतदार कार्ड / पण कार्ड / वीज बिल
3. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
4. बँक खाते / स्टेटमेंट
5. सिबिल रिपोर्ट
6. व्यवसाय प्रकल्प अहवाल
7. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे :
1. बँक कर्ज मंजुरी पत्र
2. लोन खाते बँक स्टेटमेंट
3. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
4. व्यवसाय प्रकल्प अहवाल
5. व्यवसायाचा फोटो
अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी अर्ज कसा कराल ?
अण्णा साहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम राज्य शासनाच्या अण्णा साहेब पाटील महामंडळ योजनेची ऑफिशिअल वेबसाईट वर जावं लागेल.
त्या नंतर तुम्हाला उजव्या साईटला ‘नोंदणी’ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
यामध्ये वयक्तिक सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल. जसे की, नाव / जन्मदिनांक / लिंग / आधार कार्ड नंबर / आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर / कॅप्चा कोड ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP फील केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
यानंतर पुढील कर्जासाठी अर्ज करावा लागेल त्यासाठी पुढील पेजवर…
पेज 2 :- वैयक्तिक माहिती.
पेज 3 :- निवासी तपशील
पेज 4 :- कर्ज तपशील
पेज 5 :- अपलोड
ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर हे लाभार्त्याचे शपथपत्र समोर येईल, यावर तुम्हाला I agree वर क्लिक करावं लागेल. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर OK वर क्लिक करा.
यांनतर तुम्ही पुन्हा लॉगील केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि स्थिती तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाली तर तुम्हाला मंजुरी पत्र दाखवलं जाईल तसेच तुम्हाला मॅसेज प्राप्त होईल.