Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 50,000 रु. अनुदानाची ‘या’ जिल्ह्याची दुसरी यादी अपलोड, पहा, तुमचं नाव आहे का ?

0

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे 46 हजार लाभार्थी प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले आहेत. मात्र, यातील सुमारे 1500 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत वर्ष 2017-18,18-19 व 19 -20 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर लाभ योजना सुरू केली आहे.

या योजनेस पात्र असलेल्या बीड जिल्ह्यातील 46 हजार 154 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी राष्ट्रीयीकृत, गामीण तसेच व्यापारी बँकांनी पोर्टलवर अपलोड केली आहे. पैकी जिल्ह्यातील 14 हजार 715 शेतकऱ्यांनी पहिली यादी विशिष्ट क्रमांकासह 12 ऑक्टोबरला प्रसिध्द करण्यात आली होती तर दुसरी यादी 1 नोव्हेंबरला अपलोड होईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु काहीशा विलंबानंतर आता दुसरी यादी अपलोड करण्यात आली आहे.

या यादीतील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण सीएससी केंद्रावर केले जात आहे. अद्याप 1325 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुसरी PDF लिस्ट गावानिहाय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

गेवराई

 बीड

 केज

धारूर

 आष्टी 

 अंबाजोगाई 

 माजलगाव

 

Leave A Reply

Your email address will not be published.