Take a fresh look at your lifestyle.

राज्यातल्या ‘या’ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अधिग्रहणात शेतजमीन गेलेल्यांना मिळणार 8 कोटींचा वाढीव मोबदला !

0

लोणार सरोवरात शेतजमीन शेतकऱ्यांना गेलेल्या त्यांच्या जमिनीचा वाढील मोबदला मिळणार असून त्यांचा फायदा एकूण 69 शेतजमीनधारकांना होणार आहे. याबाबत आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे.

लोणार सरोवर हे ‘अ’ दर्जा पर्यटन स्थळ घोषित झाले, त्यानंतर सरोवर जतन व संवर्धनासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले सर्वप्रथम त्यांनी सन 2011 मध्ये प्रशासनाने एकूण 69 बांधवांच्या सरोवरात असलेल्या बागायती शेतजमिनी अधिग्रहित करून त्यांना त्या जमिनीच्या बदल्या अत्यंत अल्प प्रमाणात मोबदला दिला होता.

त्यानंतर या शेतकरी बांधवांनी मोबदल्याची रकम फार तोडकी असल्याने ही समस्या मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्याकडे मांडली. त्यांनी सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन या सर्व शेतकरी बांधवांची मागणी शासन दरबारी लावून धरली.

त्यानंतर त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून त्या एकूण 69 शेतकरी बांधवांना 8 कोटी रुपयांची जमीन अधिग्रहणची वाढीव मदत मिळून दिली. यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करण्याचे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचे हेच साधन आसल्याने त्यांना मिळालेल्या तुटपुंजी मदतीमुळे अनेक वर्षापासून अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते.

परंतु, आमदार डॉ.संजय रायमूलकर यांनी ती मागणी सतत लावून धरली व सभागृहात हा प्रश्न लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकरी बांधवांना तत्काळ 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यानिर्णयाचे संबंधित शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.