केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात मोठं गिफ्ट मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसांची सुरुवात त्याच्या पगारात वाढ होऊन होणार आहे. येत्या काही दिवसांत महागाई भत्त्याबाबत (DA) आणखी एक घोषणा होणार आहे. यामध्ये आणखी 4% वाढ होणार आहे. म्हणजे एका आठवड्यानंतर त्यांचा महागाई भत्ता (DA) 38% होणार आहे. मार्चमध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA Hike) 3 टक्क्यांनी वाढवून 34% केला. यापूर्वी 31% दराने DA दिला जात होता. आता 4 टक्क्यांच्या वाढीसह तो 38 टक्क्यांवर पोहचणार आहे.

1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज…

कामगार मंत्रालयाने AICPI (All India Consumer Price Index) च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये जानेवारी ते जून या कालावधीचा समावेश आहे. AICPI इंडेक्स जूनमध्ये 129.2 अंकांवर पोहोचला आहे. यावरून जुलै 2022 च्या वाढीव महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर DA 38% होईल. 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

AICPI आकड्यांनुसार DA :-

कामगार मंत्रालय दर महिन्याच्या शेवटी मागच्या महिन्याचा AICPI डेटा जारी करते. यामध्ये महागाई निर्देशांकाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी किती भत्ता द्यायला हवा हे दाखवले जाते. पहिल्या सहामाहीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालं आहे की, डीएमध्ये 4% वाढ झाली पाहिजे. म्हणजे एकूण DA वाढून 38% होणार आहे. सप्टेंबर अखेर यावर निर्णय होईल, अशी आशाही कर्मचारी संघटनेला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणाचा किती वाढणार पगार ?
7th CPC मिनिमम सॅलरी रु.18000 रुपयावर कॅल्क्युलेशन :-

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन :- रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (38%) :- रु.6840 / महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) :- रु.6120 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढला :- 6840 – 6120 = रु.720 / महिना
5. वार्षिक पगारात 540X12 = रु. 8640 वाढ

7th CPC मिनिमम सॅलरी रु.56900 रुपयावर कॅल्क्युलेशन :-

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन :- रु. 56900
2. नवीन महागाई भत्ता (38%) :- रु. 21622 / महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) :- रु.19346 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढला :- रु. 21622-19346 = रु. 2276 / महिना
5. पगारामध्ये वार्षिक वाढ :- 1707X12 = रु. 27312

टीप : ही अंदाजानुसार पगारवाढ आहे, त्यात HRA सारखे भत्ते जोडल्यानंतरच अंतिम वेतन केलं जाईल…

इतर भत्त्यांमध्येही मिळणार लाभ :-

वर्षअखेरीस केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढणार नाही. उलट इतर हे भत्तेही वाढतील. यात प्रवास भत्ता (Travel Allowance) आणि शहर भत्ता (City Allowance) यांचा समावेश आहे. त्याच वेळी, निवृत्तीसाठी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होईल. कारण, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने या सर्व भत्त्यांवर परिणाम होतो…

कॅल्क्युलेशनमध्ये HRA चा समावेश नाहीये. 

7 व्या CPC अंतर्गत, 38% महागाई भत्त्यानुसार, 56900 रुपयांच्या मूळ वेतनावरील एकूण वार्षिक महागाई भत्ता 259,464 रुपये असेल. परंतु, 34 टक्क्यांच्या तुलनेत फरकाबद्दल बोलायचे झाल्यास, पगारातील वार्षिक वाढ 27312 रुपये होईल. मात्र, HRA ह इतर भत्ते जोडल्यानंतर अंतिम वेतन किती असेल, हे कळेल. ही सोपं कॅल्क्युलेशन केवळ एका अंदाज यावा म्हणून केली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *