ब्रेकिंग : जे व्हायला नको तेच झालं ; राज्यात आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण !

0

शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशातील तीन राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे आतापर्यंत 4 रुग्ण आढळून आले असून या आधी गुजरातमधील जामनगरमध्ये व्हेरियंटचा एका वृद्ध व्यक्ती आढळून आला असून कर्नाटकमध्येही दोन रुग्ण आढळून आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितलं की, हा 33 वर्षीय असून तो 24 नोव्हेंबरला केपटाऊनहून दुबई, दिल्लीमार्गे तो मुंबईत परतला होता. धाकादायक बाब म्हणजे तो मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असून त्याने आत्तापर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही. दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेले सर्व लोक कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत. दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत.

हा तरुण मुंबईजवळील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पोहोचला होता आणि येथे टेस्ट दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जीनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर त्याला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या या तरुणामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे असून तो रुग्ण कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

7 ते 8 दिवसांत हा व्हायरस 40 देशांमध्ये पसरला…

दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेला कोरोनाचा हा व्हेरियंट 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. 50 हून अधिक म्यूटेशन असणारा हा व्हेरियंट डेल्टा पेक्षा खूप वेगाने पसरू शकतो आणि रोग प्रतिकारशक्ती देखील कमी करू शकते. त्यामुळेच या भीतीने अनेक देशांनी आपल्या सीमा सील करून परदेशी प्रवाशांच्या येण्यावर बंदी घातली आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.