शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : येणाऱ्या सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होतेय. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणं, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणं, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
तसेच शाळा सुरु करण्याबाबत आदित्य ठाकरेंने देखील संकेत दिले आहे. त्यामुळे आजच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आज मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदितेय ठाकरेंची बैठक पार पडली. या बैठकीत 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकर कोविड रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला. राज्यातील शाळा लवकरच सुरु करण्यास आदित्य ठाकरेंनी अनुकुलता दर्शवली आहे.
In a review meeting this morning with @mybmc and experts of State Task Force for covid, we reviewed the vaccination status for 15-18 yr olds, along with our preparedness for safe re-opening of educational institutes at the earliest possible,now that cases are steadily declining.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 19, 2022
कोरोनाच्या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करुन पुन्हा एकदा घरातून ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. सगळ्यात आधी मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर खबरदारी म्हणून अनेक पालिका क्षेत्रांनी आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, आता कोरोना रुग्णवाढ पुन्हा कमी झाल्यामुळे तसंच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणालाही वेग आल्यानं शाळा पुन्हा सुरु केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले जावेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहेत. या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.