शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : बीड जिल्ह्यातील तीनही नगरपंचायती भाजपकडे गेल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. आष्टी, पाटोदा आणि शिरूरमध्ये आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली असून भाजपने सत्ता काबीज केली आहे.
बीडमधील विजयी उमेदवारांचे तसेच राज्यभरातील भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. यावेळी बीडमधील लढतीविषयी प्रश्न विचारला असता, त्या स्वतः या लढतीकडे कसे पाहतात, यावर प्रतिक्रिया दिली.
बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होती का ? असा प्रश्न विचारला असता भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, मुळात तुम्ही समजता तसे चित्र बीडमध्ये नाहीये. मी नेहमी सांगते, एका मतदारसंघाचं आणि संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व करणं यात फरक आहे. बीडचं जे चित्र आहे, ते लोकांनी स्पष्ट केलं आहे.
सध्याच्या सरकारच्या कामकाजावरील लोकांचा राग आणि रोष तसेच आमच्या काळातील कामावरील विश्वास याचेच हे परिणाम आहेत. जिल्ह्यातील लोकांनी भविष्यातील निवडणुकीसाठीही कौल दिला आहे.
केज नगरपंचायतमध्येही काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे मोठा धक्का समजला जात आहे.
पहा निकाल :-
आष्टी नगरपंचायत
भाजप – 13
राष्ट्रवादी – 02
काँग्रेस – 01
अपक्ष – 01
एकूण – 17
—————–
शिरूर कासार नगरपंचायत
भाजप – 11
राष्ट्रवादी – 04
शिवसेना – 02
एकूण – 17
—————–
वडवणी नगरपंचायत
भाजप – 08
राष्ट्रवादी – 06
राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी – 03
एकूण – 17
——————
केज नगरपंचायत
राष्ट्रवादी – शेकाप – 05
काँग्रेस – 03
जनविकास आघाडी – 08
अपक्ष – 01
एकूण –
——————-
पाटोदा नगरपंचायत
भाजप – 09
भाजप पुरस्कृत – 06
महावि – 02
एकूण – 17