Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : आधी आ.समीर मेघेंना कोरोना ; आता अधिवेशनातील तब्बल 32 जण कोरोना पॉझिटिव्ह !

0

शेतीशिवार टीम, 26 डिसेंबर 2021 : हिंगण्याचे आमदार समीर मेघेंनी कोरोना झाल्याची पुष्टी केल्यानंतर आता एक अधिवेशनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.आरोग्य विभागाकडून शनिवारी 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. परंतु आता यापैकी 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

आधीच Omicron च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यसाठी एक चिंतेची बाब निर्माण झाली असताना आता अधिवेशनातही कोरनाचं सावट पसरलं आहे.

सविस्तर माहिती अशी की, राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने काल 1500 जणांची कोरोना टेस्ट केली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 32 कोरोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

तसं पाहिलं तर हे हिवाळी अधिवेशन नागौरला होणार होतं परंतु ऐनवेळी हे अधिवेशन मुंबईत घेण्यात येत आहे. दोन आठवड्याचं असून पहिल्या आठवड्यात तीन दिवस आणि येणाऱ्या आठवड्यात दोन दिवस, असा कालावधी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेला होता.

या पार्श्वभूमीवर दोन्ही आठवड्यांच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. या चाचणीत 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

चिंता वाढली… आज राज्यात Omicron चे तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण…

युरोपियन देशांमध्ये ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरात Covid-19 च्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.आता देशातही कोरोनाह प्रसार वेगाने होऊ राहिला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून राज्यात आज तब्बल 31 नवे रुग्ण आढळले आहे.

यापैकी 27 रुग्ण एकट्या मुबईमध्ये आढळले आहे तर ठाण्यात 2 ,पुणे ग्रामीण 1 आणि अकोल्यात 1 रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील (Omicron) व्हेरियंटची रुग्णसंख्या 141 वर पोहचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.