Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : ‘त्या’ शाळेत पुन्हा कोरोनाचा स्फोट ; तब्बल 52 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह ; जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर…

0

शेतीशिवार टीम, 25 डिसेंबर 2021: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातून पुन्हा एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

या शाळेतील 16 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचार घेत असताना 2 दिवसात पूर्ण शाळेचं टेस्टिंग केल्यानंतर शुक्रवारी 27 तर शनिवारी 25 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण संख्या ही 71 वर पोहचली आहे.

या आधी 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य प्रशासनाने याची गंभीर दखल घेत पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांची तपासणी सुरू केली होती. परंतु आता यामध्ये आणखी 52 विद्यार्थ्यांची भर पडली असून त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कमी झालेली कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 7 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

घटनेचे वाढते गांभीर्य पाहून जिल्हा प्रशासनही अलर्ट झालं आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हे सध्या पारनेर दौऱ्यावर असून ते आज दुपारी नवोदय विद्यालय परिसराची पाहणी करणार आहेत.

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून 406 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील काहींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. सुरूवातीला यामध्ये 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर आरोग्य प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची तपासणी सुरू केली होती. आजच्या तपासणीत आणखी 52 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर मंगेज वाळूज आणि पायलट विशाल कुमार पाखरे यांच्या मदतीनं पारनेरच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे या मुलांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत. नगर जिल्ह्यातच दोन शाळांमध्ये मिळून जवळपास 80 हुन अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या राज्यात Omicron वाढता प्रसार पाहून राज्यात निर्बंध लादले आहे परंतु शाळा अजूनही सुरु असून विद्यार्थ्यांचं काय होणार असा प्रश पालक उपथित करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.