शेतीशिवार टीम, 4 जानेवारी 2022 : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढताना दिसून येत असून मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोनाने थैमान घातलं आहे. या कोरोनाला आला घालण्यासाठी आता राज्य सरकारने मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही पहिली ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचे घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासोबतच पुण्यात काही कडक निर्बंध लादले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे शहर आणि पिपरी चिंचवडमधील शाळा बंद राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

मात्र, मुलांचे वर्ग ऑनलाइन सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुण्यात आज मंगळवारी Covid-19 संसर्गाचे 1,104 रुग्ण आढळले आहेत. येथे पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्क्यांवर पोहोचला असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

पहा नवे नियम :-

लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर उद्यापासून पुणे जिल्ह्यात मॉल, खासगी, सरकारी कार्यालयात प्रवेश बंदी असणार आहे. या बाबतच्या सूचना पोलीस खात्याला दिल्या आहेत.

लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर उद्यापासून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच पीएमपीएमलच्या बसनेही प्रवासास बंदी घालण्यात आली आहे.

पुण्यात उद्यापासून तोंडावर मास्क लावलेला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर तोंडावर मास्क नसेल आणि तो व्यक्ती रस्त्यावर थुंकला तर त्याला 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ही उद्यापासून सुरु होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *