शेतीशिवार टीम, 4 जानेवारी 2022 : 2021 मध्ये असे अनेक Penny stock होते, जे मल्टीबॅगर्स बनले आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा अनेक पटींनी वाढला. काही पेनी स्टॉकची 2022 मध्येही चांगली सुरुवात झाली आहे. असे तीन Penny stock आहेत – Swastika Vinayaka Synthetic, Swastika Vinayaka Art आणि HB Stockholdings.
2022 च्या पहिल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागले आहे. त्याच वेळी, या शेयर्समध्ये 2021 च्या शेवटच्या 4 ट्रेंडिंग सत्रामध्ये देखील अपर सर्किट लागला होता. यामुळे या 3 Penny stock ला त्यांच्या शेअर्सचे पैसे दुप्पट करण्यास मदत झाली आहे.
Swastika Vinayaka Synthetic :
27 डिसेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत प्रति स्टॉक 6.66 रुपये होती, जी आता प्रति शेअर 13.36 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. या कालावधीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
Swastika Vinayaka Art :
हा Penny stock 27 डिसेंबर 2021 रोजी रु. 4.61 वर स्टॉप झाला.आता ते 9.25 रुपये प्रति शेअर या हाय लेव्हलवर पोहोचली आहे. गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये याने 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.
HB Stockholdings :
27 डिसेंबर 2021 रोजी, या Penny stock ची किंमत 37.35 रुपये होती, तर मंगळवारच्या व्यापारात याने 75.05 रुपये इंट्राडे हाय केला. गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 100 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.