महाअपडेट टीम, 4 जानेवारी 2022 : अहमदनगर जिल्ह्याची राजकारणातली ओळख म्हणलं की, सोयऱ्याधायऱ्यांचं राजकरण येतं. जिल्ह्यात सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणाचा प्रयोग नगर शहर व तालुक्यात यशस्वी झाल्यानंतर आता त्याचे लोण जिल्हाभर पसरलं आहे. आता याच राजकारणाचा पुढचा अध्याय घुले-गडाखांच्या सोयरिकीने लिहिला जात आहे.

आज ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख  साखरपुडा काल राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी पार पडला आहे.

सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबांकडून आपसात सोयरिक जुळवण्याचा ट्रेड जोरदार सुरू असल्याने आता यामध्ये गडाख – घुले परिवाराचीही एंट्री झाली आहे. गडाख आणि घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं असून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.

आमदार घुले यांची मोठी कन्या कोपरगावचे आमदार व शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना दिली आहे तर आता दुसरे जावई हे उदयन गडाख होणार असून गडाख आणि घुले यांचे विधानसभा मतदारसंघही शेजारी शेजारी आहेत. महाविकास आघाडीमुळे राजकीयदृष्ट्याही ते एकत्र आलेले असून नक्कीच राजकीयदृष्ट्या दोघांनाही याचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *