शेतीशिवार टीम, 5 जानेवारी 2022 : पाथर्डी तालुक्यात मा. आमदार स्व. माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंती निमित्त निऱ्हाळी करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी स्पर्धेतील विजयी संघा सोबत प्रताप ढाकणे यांनी चक्क जल्लोष जल्लोष करत डान्स केल्याचं पाहावयास मिळालं. सध्या हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सध्या पाथर्डी नगरपालिकेतील सदस्यांची मुदत संपली असून निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी जनसंपर्क वाढवू लागले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे आघाडीवर आहेत.
माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंती निमित्त निऱ्हाळी करंडक स्पर्धेचाअंतिम सामना पार पडल्या नंतर विजयी संघातील खेळाडूणी डीजेच्या तालावर ठेका धरला.
त्यानंतर सिंहगड संघाचे कर्णधार व बाजार समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाठ यांनी ढाकणे यांना खांद्यावर उचलून घेतलं अन् मग एकच जल्लोष होऊन सर्व खेळाडूंसमवेत ढाकणे यांनी सुद्धा ताल धरला.