शेतीशिवार टीम, 5 जानेवारी 2022 : लोक फार या ठिकाणी लक्ष देत नाहीत…परंतु, प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्याच्या तळाशी अगदी नाकाजवळच खूप लहान छिद्र असतं. ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो पण आरशामध्ये डोकावून कधी असं वाटत की, कोणीतरी सुईने किंवा ऑलपेइनने टोचले आहे असे दिसतं.
हे पाहून काही लोक घाबरतात. त्यांना असं वाटतं की, एखाद्या कीटकाने तर बिळ बनवलं नाही ना ? हे लहान छिद्र डोळ्यात का आहे ? चला तर मग ते जाणून घेऊया…
याबाबत काही लोकं कन्फ्यूजनमध्ये आहे त्यांना असं वाटत की, या छोट्या छिद्रातून अश्रू बाहेर पडतात. असा त्यांचा दावा आहे, पण ही माहिती अगदी खोटी आहे. डोळ्याच्या खालच्या पापणीवर, नाकाच्या अगदी जवळ असलेल्या या लहान छिद्राला सामान्य भाषेत अश्रू बिंदू (Tear point) म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव लॅक्रिमल पंकटम (lacrimal punctum) आहे.
lacrimal punctum म्हणजेच टियर पॉइंट काय काम करतं ?
डोळ्याच्या वरच्या पापणीतून अश्रू येऊ लागतात, तेव्हा डिअर टीअर (बिंदू) खालच्या थरावर अँक्टिव्ह होऊन थोडा मोठा होतो. त्यामुळे ज्यावेळी डोळ्यांत पाणी भरून येतं असल्याने ते डायडेक्ट जास्त प्रमाणात न वाहता नाकाकडे वळवतं. त्यामुळे जेव्हा अश्रूंच्या धारा वाहू लागतात त्यावेळी नाकातून पण पाणी वाहू लागतं.