शेतीशिवार टीम, 5 जानेवारी 2022 : भारतामध्ये , विविध प्रकारचे रोग टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी ऋतूनुसार अनेक पर्याय उपलब्ध असतात.थंडीच्या दिवसात कमी रक्तदाब(लो ब्लड प्रेशर), वजन कमी करणे, हिमोग्लोबिनची कमतरता, अशक्तपणा वर उपचार, बद्धकोष्ठता आणि पोटाचे वेगवेगळे आजार आणि थंडीच्या वातावरणात मूळव्याध सारख्या वेदनादायक आजारांपासून सुटका यासाठी सोपे घरगुती उपाय जवळपास प्रत्येक रस्त्याच्या काना-कोपऱ्यावर उपलब्ध आहेत.
मुळ्याच्या पानांमध्ये कोणते घटक असतात ?
मुळा आणि त्याची फक्त 10 रुपयांची पाने तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. बहुतेक लोक मुळ्याची पाने फेकुन देतात परंतु त्यांना कदाचित माहित नसेल की मुळ्याच्या पानांमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, क्लोरीन, सोडियम,आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, बी, ए आणि क्लोरीन असते. ही पाने खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात.
बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय :-
मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. याच्या सेवनाने पचनाचे आजार बरे होतात. तर ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची तसेच पोटात गॅसची समस्या असेल तर तुम्ही मुळाच्या पानाचे सेवन करा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुळ्याच्या पानांचा रस बनवून रोज सकाळी पिऊ शकता.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावं :-
मुळ्याच्या पानांमध्ये आयर्न आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए, थायामिन यांसारखे मिनरल्स देखील असतात, जे थकवा दूर करण्यास मदत करतात. ज्या लोकांना ऍनिमिया आणि हिमोग्लोबिनची समस्या आहे. अशा रुग्णांना मुळ्याच्या पानांचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.
हिवाळ्यात मूळव्याध वर घरगुती उपाय :-
मुळव्याध सारख्या वेदनादायक आजारांवर मुळ्याची पाने खूप मदत करतात. मुळ्याची पाने जळजळ कमी करण्यास मदत करतात. मुळ्याची कोरडी पाने बारीक करून त्यात साखर आणि थोडे पाणी समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टचे चमच्याने सेवन करा.
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी काय करावं :-
जर तुम्हाला कमी रक्तदाबाची(लो ब्लड प्रेशर) समस्या असेल तर मुळ्याच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरेल. मुळ्याच्या पानांमध्ये असलेले सोडियम शरीराला लाभदायक ठरते. यामुळे शरीरातील मीठाची कमतरता दूर होते. तर ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे.तर रोज सकाळी मुळ्याच्या पानांचा रस सेवन करा.