गणपतराव फक्त तुम्हीच ओ…! ड्रॅगनफ्रुटच्या लागवडीतून वर्षभरात घेतलं 1 कोटी 65 लाखांचे उत्पन्न, शासनाकडून हेक्टरी मिळवा 1.60 लाखांचे अनुदान
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील गणपत ठेवरे यांनी 15 एकरवर ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आहे. तसे पाहायला गेले तर पंधरा एकरातील हे संपूर्ण शेत अगदी माळरान आहे ज्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचे कोणतेही पीक घेणे सुद्धा कठीणच त्या ठिकाणी ठेवरे यांनी ड्रॅगन फ्रुट सारखे पीक फुलवण्याची किमया करून दाखवली आहे.
कमीत कमी पाण्यात आणि माळरानावर आधुनिक पद्धतीने शेती करता येईल असे पीक म्हणजे ड्रॅगन फ्रुट..
शेतकरी गणपत ठेवरे यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याआधी जवळजवळ एक वर्ष या पिकाचा अभ्यास करण्यात घालवला. ते गुजरात मधील कच्छ, भुज तेलंगणा मधील काही ठिकाणी जाऊन त्यांनी या पिकाचा अभ्यास केला होता. जगात ड्रॅगन फ्रुटच्या 153 प्रजाती आहेत त्यापैकी गणपतराव ठवरे यांनी सी टाईप ही प्रजाती निवडली.
11 एकरामध्ये 11 X 7 या अंतरावर एकरी 566 पोल लावण्यात आले एका पोलला चार रोपे याप्रमाणे एकरी 2264 रोपांची लागवड करण्यात आली. प्रतिरोप 70 रुपये याप्रमाणे केवळ लागवडीसाठी त्यांना पावणेदोन लाख रुपये लागले होते.
ड्रॅगन फ्रुट या पिकावर अत्यंत कमी रोगांचा प्रादुर्भाव होतो असे गणपतराव ठेवरे यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी एकही फवारणी केलेली नाही त्यापूर्वी पावसाळ्यातले पाच महिने महिन्यातून दोनदा बुरशीनाशकाची फवारणी याप्रमाणे दहावेळा त्यांनी फवारणी केली आहे.
खतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा असे ठेवरे यांनी सांगितले, फळांच्या वाढीसाठी पोटॅश विद्राव्य स्वरूपात देण्यात यावे तसेच रोपांच्या वाढीसाठी 19-19-19 हे खत विद्राव्य स्वरूपात द्यावे असेही त्यांनी सांगितले.
लागवडीनंतर बारा महिन्यांनी उत्पन्न चालू होते योग्य वेळी म्हणजे जून महिन्यात लागवड केल्यास पहिले उत्पन्न एकरी 10 ते 12 टन होते असे ठेवरे यांनी सांगितले दुसऱ्या उत्पन्नाच्या वेळेस हेच उत्पन्न दुप्पट होते.
ठेवरे यांना प्रति-किलो जास्तीत जास्त 250 तर कमीत कमी 90 रुपये याप्रमाणे भाव मिळाला याप्रमाणे सरासरी 120 रुपये भाव त्यांना मिळाला आहे. अशाप्रकारे पहिल्याच वर्षी त्यांना एकरी 11 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळालं आहे पुढच्या वर्षी हेच उत्पन्न दुप्पट होईल अशी त्यांना आशा आहे.
तसं पाहिलं तर ड्रॅगन फ्रुट हे भारतीय नाहीये, परंतु त्याला पोषक वातावरण मिळालं तर कुठेही येऊ शकतं. त्याची चवही अप्रतिम आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये फिनोलिक अँसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि बीटासायनिन यांसारखे अँटीऑक्सिडंट असतात. हे आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे आणि कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजार बरे होतात.
ड्रॅगन फ्रूट हे ताजे फळ म्हणून वापरण्याव्यतिरिक्त जॅम, आइस्क्रीम, जेली उत्पादन, फळांचा रस, वाइन इत्यादी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे फळ खायला चविष्ट आहे. लागवडीबाबत अधिक माहिती तुम्ही YOUTUBE वर ही पाहू शकता..
आपल्या देशात पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्ये याचे सर्वाधिक उत्पादन करतात. राज्य सरकारांद्वारे ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ड्रॅगन फ्रुटला 1,60,000 रु. अनुदान देण्यात येत आहे, याचा अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीही ड्रॅगन फ्रुट लागवड करून 1,60,000 रु. अनुदान मिळवण्यास इच्छुक असाल तर पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन स्टेप बाय स्टेप अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी :– इथे क्लिक करा
गणपत रावांची यशोगाथा व्हिडिओ द्वारे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा